By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 01:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आयुक्त अजोय मेहता यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती केली जाणार आहे. मेहता यांच्या नियुक्तीचे अधिकृत आदेश आज, शुक्रवारी दुपारनंतर दिले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते पदाचा कार्यभार स्वीकारतील. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाकडून मेहतांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे विद्यमान मुख्य सचिव यूपीएस मदान हे स्वेच्छानिवृत्ती घेणार आहेत. मेहता हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. मदान हे यावर्षी ऑक्टोबरमध्ये निवृत्त होणार होते. ते या पदावर कायम राहिले असते तर, मेहतांना सचिवपद मिळालं नसतं, असं बोललं जात आहे. दरम्यान, मुंबई महापालिका आयुक्तांच्या नियुक्तीची घोषणा लवकरच होणार आहे, असं अधिकार्यांनी सांगितलं. अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी हे आयुक्तपदाच्या मुख्य शर्यतीत असल्याचं सांगितलं जात आहे.
लोकसभेच्या सहाव्या टप्यातील मतदान 12 मे रोजी होत आहे. या टप्यात दिल्लीतील मत....
अधिक वाचा