ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनाच्या रुग्णांसाठी रुग्णालयं कमी पडू नये, केईएम आणि नायर रुग्णालयं रिकामी करण्याचे आयुक्तांचे आद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 21, 2020 11:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनाच्या रुग्णांसाठी रुग्णालयं कमी पडू नये, केईएम आणि नायर रुग्णालयं रिकामी करण्याचे आयुक्तांचे आद

शहर : मुंबई

जगभरात कोरोना विषाणूने हाहा:कार माजवला आहे. देशासह मुंबई आणि महाराष्ट्रातही दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. मुंबई आणि परिसरातील कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे रुग्णांची सतत वाढत जाणारी संख्या पाहता रुग्णालये कमी पडणार असल्याने पालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयांमधील आरोग्य सेवेची गरज नसणाऱ्या रुग्णांना डिस्चार्ज देऊन रुग्णालये रिक्त कण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, कोरोनाच्या रुग्णांसाठी रुग्णालये आणि आरोग्य कर्मचारी सज्ज ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.

सध्या कस्तुरबा रुग्णालयात 122 , जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात 5 असे एकूण 127 रुग्ण भरती आहेत. कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशनचे 127 बेड असून त्यावर सध्या 122 रुग्ण आहेत. या रुग्णालयात कोरोनाची लागण झालेले आणि संशयित रुग्ण मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे बेडची कमतरता भासण्याची शक्यता आहे. त्यासाठी पालिकेच्या आणि खासगी रुग्णालयात आयसोलेशन बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत.

पालिकेकडे सध्या असलेल्या बेडची क्षमता येत्या काही दिवसात संपणार आहे. सध्या वाढणाऱ्या रुग्णांची आकडेवारी पाहता येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात आयसोलेशन वॉर्ड आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी परेल येथील केईएम आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय रिक्त करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या रुग्णांना रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता नाही, अशा रुग्णांना घरी पाठवून ते बेड कोरोनाच्या बाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, पुण्यात आखणी एका महिलेला कोरोना

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात आणखी एका महिलेला कोरोनाची लागण आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 53 झाली आहे. तर पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. सध्या या महिलेवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

पिंपरी चिंचवड – 12

पुणे – 10

मुंबई – 11

नागपूर – 4

यवतमाळ – 3

कल्याण – 3

नवी मुंबई – 3

रायगड – 1

ठाणे -1

अहमदनगर – 2

औरंगाबाद – 1

रत्नागिरी – 1

उल्हासनगर – 1

एकूण 53

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च

पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च

पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च

पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च

मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च

नागपूर (1) – 12 मार्च

पुणे (1) – 12 मार्च

पुणे (3) – 12 मार्च

ठाणे (1) – 12 मार्च

मुंबई (1) – 12 मार्च

नागपूर (2) – 13 मार्च

पुणे (1) – 13 मार्च

अहमदनगर (1) – 13 मार्च

मुंबईत (1) – 13 मार्च

नागपूर (1) – 14 मार्च

यवतमाळ (2) – 14 मार्च

मुंबई (1) – 14 मार्च

वाशी (1) – 14 मार्च

पनवेल (1) – 14 मार्च

कल्याण (1) – 14 मार्च

पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च

औरंगाबाद (1) – 15 मार्च

पुणे (1) – 15 मार्च

मुंबई (3) – 16 मार्च

नवी मुंबई (1) – 16 मार्च

यवतमाळ (1) – 16 मार्च

नवी मुंबई (1) – 16 मार्च

मुंबई (1) – 17 मार्च

पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च

पुणे (1) – 18 मार्च

पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च

मुंबई (1) – 18 मार्च

रत्नागिरी (1) – 18 मार्च

मुंबई महिला (1) – 19 मार्च

उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च

अहमदनगर (1) – 19 मार्च

मुंबई (2) – 20 मार्च

पुणे (1) – 20 मार्च

पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च

पुणे (1) – 21 मार्च

एकूण – 53 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च

दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च

पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च

एकूण – 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

मागे

राज्यात एका दिवसात 11 कोरोनाबाधित रुग्ण वाढले, आरोग्यमंत्र्यांची माहीती
राज्यात एका दिवसात 11 कोरोनाबाधित रुग्ण वाढले, आरोग्यमंत्र्यांची माहीती

राज्यात एका दिवसात 11 कोरोनाबाधित रुग्ण वाढले असून आजचा आकडा 63 वर गेल्याची मा....

अधिक वाचा

पुढे  

हातावर 'क्वारंटाईन'चे शिक्के, तरीही रेल्वेने प्रवास, दोघांना विरारमध्ये उतरवलं!
हातावर 'क्वारंटाईन'चे शिक्के, तरीही रेल्वेने प्रवास, दोघांना विरारमध्ये उतरवलं!

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, अनेकांना य....

Read more