ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोना संदर्भात नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे बीएमसीच्या आयुक्तांचे आदेश

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 19, 2021 07:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोना संदर्भात नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे बीएमसीच्या आयुक्तांचे आदेश

शहर : मुंबई

राज्यात कोरोना पुन्हा वाढू लागल्याने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांचे सक्‍त कारवाईचे आदेश दिले आहेत. पाचपेक्षा अधिक रुग्‍ण आढळणाऱ्या इमारती करणार प्रतिबंधीत केल्या जाणार आहेत. होम क्‍वारंटाईन केलेल्‍या नागरिकांच्‍या हातावर शिक्‍के मारले जाणार आहेत. विना मास्‍क रेल्‍वे प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी ३०० मार्शल नेमण्यात आले आहेत. विना मास्‍क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार आणि दंड वसूल केला जाणार आहे. मंगल कार्यालये, क्‍लब, उपहारगृहं इत्‍यादी ठिकाणी धाडी टाकण्‍याच्‍या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. ब्राझिलमधून मुंबईत येणारे प्रवासीदेखील आता संस्‍थात्‍मक विलगीकरणात असणार आहेत. रुग्‍ण वाढत असलेल्‍या विभागांमध्‍ये तपासण्‍यांची संख्‍या वाढवणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

- लग्‍न समारंभाची मंगल कार्यालये, जिमखाना/क्‍लब्‍ज, नाईट क्‍लब्‍ज, उपहारगृहं, चित्रपटगृहं, सर्वधर्मिय स्‍थळं, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, तसेच सर्व खासगी कार्यालये अशा सर्व ठिकाणी मास्‍कचा वापर बंधनकारक आहे. मास्‍कचा वापर होत नसल्‍याचे आढळल्‍यास आणि ५० पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकावेळी आढळल्‍यास संबंधित व्‍यक्तिंना दंड करण्‍यासोबत त्‍या-त्‍या ठिकाणच्‍या आस्‍थापनांवर, व्‍यवस्‍थापनांवर गुन्‍हे दाखल करण्‍यात येणार आहे.

- लग्‍नसोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी केली जाणार असून तिथे कोणत्‍याही नियमांचे उल्‍लंघन झालेले असेल तर दंडात्‍मक कारवाई करुन लग्‍नाचे आयोजक/पालक तसेच संबंधित व्‍यवस्‍थापनांवर देखील गुन्‍हे दाखल करण्यात येणार आहे.

- सार्वजनिक जागी थुंकणाऱ्या लोकांवर कारवाई होणार आहे. यासाठी २,४०० मार्शल्सची संख्‍या दुपटीने वाढवून ती ४,८०० इतकी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- मुंबईतील पश्चिम, मध्‍य आणि हार्बर उपनगरीय रेल्‍वे सेवांच्‍या गाड्यांमध्‍ये विना मास्‍क प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्‍यासाठी प्रत्‍येकी लाईनवर १०० यारितीने एकूण ३०० मार्शल्‍स नेमून विनामास्‍क प्रवास करणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.

- कारवाई करण्‍यासाठी आता पोलिसांनाही अधिकार देण्‍यात येत असून पोलीस देखील मार्शल म्‍हणून नागरिकांना दंड आकारुन कारवाई करु शकतील.

- बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या मालकीच्‍या सर्व इमारती, कार्यालये, रुग्‍णालये आदी ठिकाणी आवश्‍यकतेनुसार महानगरपालिकेच्‍या शिक्षकांची नियुक्‍ती करुन त्‍यांना विना मास्‍क फिरणाऱयांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍याचे अधिकार देण्‍यात येतील.

मागे

राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ, प्रशासनाच्या चिंता वाढल्या
राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ, प्रशासनाच्या चिंता वाढल्या

राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. आज कोरोना रुग्णांमध्ये मोठ....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आणखी किती काळ टोलवसुली करणार ?- हायकोर्ट
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आणखी किती काळ टोलवसुली करणार ?- हायकोर्ट

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आणखी किती काळ टोलवसुली करणार अशी विचारणा हायकोर....

Read more