ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई महापालिकेची नऊ रुग्णालये पुन्हा 'नॉन कोव्हिड', साथीच्या आजारांवर उपचार होणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 21, 2020 11:53 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई महापालिकेची नऊ रुग्णालये पुन्हा 'नॉन कोव्हिड', साथीच्या आजारांवर उपचार होणार

शहर : मुंबई

पावसाळ्यात साथीच्या आजारांवरही उपचार व्हावेत, यासाठी मुंबई महापालिकेने नऊ रुग्णालये ‘नॉन कोव्हिड’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘कोरोना’शिवाय इतर आजार झालेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे बीएमसीने मुंबई उपनगरातील 16 रुग्णालये कोव्हिड रुग्णालये म्हणून घोषित केली होती. आता यातील 9 रुग्णालये पुन्हा ‘नॉन कोव्हिड’ करण्यात आली आहेत. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टोसारखे आजार बळावतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

या रुग्णालयांमध्ये पासून (सोमवार 20 जुलै) पासून कोरोनाग्रस्त रुग्णांना नव्याने दाखल करुन घेतले जाणार नाही. तिथले बाह्यरुग्ण विभाग सुरु राहतील. या रुग्णालयात आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना कोव्हिड सेंटर आणि नायर, केईएम, सायन रुग्णालयात दाखल करण्यात येईल.

मुंबई उपनगरातील कोरोनाग्रस्त रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत, यासाठी पालिकेने एप्रिलपासून राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा अशी 16 रुग्णालये कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित केली होती.आता मोठ्या संख्येने बेड्स उपलब्ध झाल्याने उपनगरातील निम्म्या रुग्णालयात नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार होणार नाहीत. सध्या या रुग्णालयात जे रुग्ण दाखल आहेत, त्यांच्यावर उपचार होत राहतील.

सायन, केईएम आणि नायरमध्ये कोव्हिड तसेच नॉन कोव्हिड अशा दोन्ही रुग्णांवर उपचार केले जातील. पण अधिकाधिक रुग्णांना आता कोविड सेंटरमध्येच सामावून घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.दुसरीकडे, मुंबईतील 186 पैकी 160 दवाखानेही आता नॉन कोव्हिड करण्यात आले आहेत. तर 28 प्रसुतिगृहांपैकी आता केवळ तीन प्रसुतिगृहे कोव्हिड तर उर्वरित 25 नॉन कोव्हिड असतील.

 

पुढे  

दिशाभूल करणार्‍या जाहिरातींना चाप, खरेदीपूर्वीही तक्रार शक्य, सुधारित ग्राहक संरक्षण कायदा लागू
दिशाभूल करणार्‍या जाहिरातींना चाप, खरेदीपूर्वीही तक्रार शक्य, सुधारित ग्राहक संरक्षण कायदा लागू

देशभरात  (20 जुलै) पासून सुधारित ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू झाला आहे. या काय....

Read more