By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 18, 2020 10:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून लाडक्या गणरायाच्या आगमन आणि विसर्जनासाठी काही नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार यंदा घरगुती गणपतींचे आगमन तीन ते चार दिवस आधी करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. तसेच यंदा नागरिकांना कोणत्याही नैसर्गिक स्थळांवर थेट विसर्जन करता येणार नाही, अशीही सूचना केली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तींचे किंवा घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करणाऱ्या भाविकांसाठी गणेशमूर्ती संकलन केंद्रांची उभारणी व त्यासंदर्भातील विशेष सूचना. pic.twitter.com/An0SDejfJO
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 17, 2020
मुंबई महापालिकेकडून गणेश विसर्जनसाठी नियमावली
मुंबई शहरात एकूण 70 नैसर्गिक विसर्जन स्थळं आहेत. यावर्षी गेल्या वर्षीच्या पाच पटीने अधिक म्हणजेच 167 कृत्रिम विसर्जन स्थळे तयार करण्यात आली आहेत. तसेच सोसट्यांच्या आवारात कंटेन्मेंट झोनमध्ये तात्पुरती विसर्जन स्थळे तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विभाग स्तरावर फिरती विसर्जन स्थळे देखील तयार करण्यात आली आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहता यंदा गणेशमूर्तीचे विसर्जन पूर्णत: गर्दी टाळून करणे बंधनकारक राहील.या वर्षी फिरते गणेशमूर्ती संकलन केंद्र देखील विभाग स्तरावर सुरु करण्यात येतील.
नैसर्गिक विसर्जनस्थळं तसेच कृत्रिम विसर्जन स्थळे यांच्यापासून 1 ते 2 कि.मी राहणाऱ्या लोकांनी त्याचा वापर करावा. अशा नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांना थेट विसर्जन करता येणार नाही. या ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था केली जाईल. त्या ठिकाणी पालिकेमार्फत करण्यात येईल.तसेच घरगुती गणपतींचे आगमन हे दरवर्षी प्रतिष्ठापनेच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी केले जाते. मात्र यंदा कोरोनाची स्थिती लक्षात घेता गणेशचतुर्थीच्या तीन ते चार दिवस आधी मूर्तींचे आगमन करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.
ऐन पावसाळ्यात मुंबईतील इमारती कोसळ्याची आणखी एक घटना घडली. वांद्रे येथील श....
अधिक वाचा