By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2019 04:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता गृहीत धरून मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्यांना 15 हजार रुपये बोनस प्रशासनाने आज जाहीर केला.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली तर महापालिका कर्मचार्यांच्या बोनसबाबत निर्णय घेता येणार नाही. बोनस म्हणजेच दिवाळीनिर्मित सानुग्रह अनुदान देण्याचा जर निर्णय घेतला गेला नसता आणि आचारसंहिता लागू झाली असती तर यासंबंधी निर्णय घेण्यासाठी आचारसंहिता उठण्याची वाट पहावी लागली असती. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असता. कदाचित त्यासाठी कामगार संघटनांनी आंदोलनही सुरू केले असते. या सर्व शक्यता गृहीत धरून आणि आंदोलन करण्यापूर्वीच प्रशासनाने बोनस जाहीर केल्यामुळे कामगार खुष झाले. पालिकेच्या नियमित वेतन श्रेणीतील पूर्णवेळ कर्मचार्यांना हे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. गेल्या वर्षीही 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते.
मुंबईत आज अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने कालच हवामान विभागाने रेड अलर....
अधिक वाचा