By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2019 01:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बेस्ट कामगार आपल्या मागण्यासाठी आंदोलन करीत असतानाच आता महापालिका कर्मचारीही आपल्या प्रलंबित मागण्यासाठी संप पुकारण्याच्या तयारीत असल्याचे कळते. या संदर्भात मुंबई महापलिका कामगार संघटनाच्या नेत्यांची काल मंगळवारी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासोबत बैठक झाली. यात कोणताही तोडगा निघाला नाही, त्यामुळे संघटना आज आझाद मैदानात शक्ति प्रदर्शन करणार आहेत. आंदोलनात कोणत्याही क्षणी संप पुकारला जाईल, अशी माहिती समन्वय समितीचे निमंत्रक सुखदेव कशिद यांनी दिली.
यासंबंधी अधिक माहिती देताना म्युनिसिपल मजदूर युनियनचे नेते सुखदेव कशिद यांनी पुढे सांगितले की, 7व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर वेतनवाढीसह सर्व भत्त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वाटाघाटी समितीची स्थापना करून संपूर्ण करार लवकरच करण्यात यावा, तसेच वाढीव घरभाडे भत्त्याची थकबाकी 1 जानेवारी 2016 पासून देण्यात यावी व कराराची थकबाकी गणपतीपूर्वी एकरकमी द्द्यावी, बायोमेट्रिक हजेरीतील त्रुटी अद्द्याप दूर झालेल्या नाहीत. ही सदोष बायोमेट्रिक पद्धत बंद करण्यात यावी, 1 सप्टेंबर 2019 पासून कर्मचार्यांची गटविमा योजना पूर्ववत करण्याचे मान्य केले आहे. मात्र ही योजना स्थापित केलेल्या दिनांकापासून म्हणजेच 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कामगार कर्मचार्यांनी औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी जी रक्कम खर्च केली असेल ती देण्याचे मान्य केले होते. अद्द्याप पर्यंत ही रक्कम मिळालेली नाही. पालिकेच्या सेवेत 5 मे 2008 नंतर रुजू झालेल्या कर्मचार्यांना पूर्वीच्या कर्मचार्यांना मिळणारी पेंशन योजना पूर्वलक्षी प्रभावाने सुरू करावी. कंत्राटी कामगारांना पालिकेच्या सेवेत कायम करावे, तसेच यापुढे कायम कामगारांची असलेली कामे कंत्राटी पद्धतीने देण्यात येवू नयेत यासह कामगारांच्या विविध मागण्या आहेत.
गेले दोन दिवस बेस्ट बसचे कामगार संपावर जाणार असल्याची चर्चा रंगली होती. तथा....
अधिक वाचा