ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सुशांतच्या मृत्यूचं कारण अखेर उघड, पाहा काय म्हणतो नवा रिपोर्ट

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2020 12:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सुशांतच्या मृत्यूचं कारण अखेर उघड, पाहा काय म्हणतो नवा रिपोर्ट

शहर : मुंबई

कोणत्याही गॉडफादरचा वरदहस्त असल्याशिवाय अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं कलाविश्वात आपला ठसा उमटवला. फार कमी कालावधीतच प्रसिद्धीझोतात येत त्यानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. पण, करिअरमध्ये असं एक वळण आलं, की सुशांतनं त्याच्या आयुष्याचाच प्रवास संपवण्याचा निर्णय़ घेतला. त्याचा गळफास लावलेला मृतदेह अनेक प्रश्नांना वाचा फो़डून गेलं.

काही महिन्यांपूर्वीच सुशांतनं मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. पण, ही हत्या असल्याचा सूरही अनेकांनीच आळवला. अखेर सुशांतच्या मृत्यूचं गुढ बऱ्याच अंशी उकलल्याचं स्पष्ट होत आहे. सीएफएसएल म्हणजेच सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालानुसार सुशांतच्या मृत्यूप्रकरणी हत्येचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.

सुशांतच्या आत्महत्येच्या घटनेचा प्रसंग तपासाच्या अनुशंगानं पुनरुज्जीवित करण्यात आला. पण, यातही सुशांतनं आत्महत्या केल्याचंच उघड झाल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये त्यानं गळफास लावल्याचं निष्पन्न होत आहे. CFSL नं हा अहवाल सीबीआयकडे पाठवला आहे. ज्यावर आता सीबीआयचा अधिकृत दुजोरा प्रतिक्षेत आहे.

सुशांतच्या मृत्यूचं कारण  partial suicide असल्याचाच दावा या अहवालातून करण्यात आला आहे. ज्यामध्ये मृत व्यक्तीचे पाय फाशीच्या वेळी पूर्णपणे हवेत नव्हते. त्याचे पाय बेड अथवा जमिनीला टेकले होते. क्राईम सीन रिक्रिएशन आणि आत्महत्येसाठी वापरण्यात आलेल्या कापडाची पडताळणी केल्यानंतरच हा अहवाल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. हातांचा सरळ वापर करणारी व्यक्तीच असं करु शकते असा निष्कर्ष काढत खुद्द सुशांतचनंच फास लावून घेतल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. थोडक्यात या अहवालाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आल्यामुळं सुशांतच्या आत्महत्या प्रकरणीच्या तपासावरही लवकरच पडदा पडण्याची चिन्हं आहेत.

 

मागे

'माझे हॉस्पिटल, माझी जबाबदारी' नाही का? मोहिमेला स्टाफ गेल्यावर दवाखाने कसे चालणार? डॉक्टरांचा सवाल
'माझे हॉस्पिटल, माझी जबाबदारी' नाही का? मोहिमेला स्टाफ गेल्यावर दवाखाने कसे चालणार? डॉक्टरांचा सवाल

राज्य शासनाची कोरोनाच्या काळातील घरोघरी जाऊन रुग्ण तपासणीची मोहीम सध्या स....

अधिक वाचा

पुढे  

सरकार सांगतं लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमध्ये 800 बेड,प्रत्यक्षात 325 बेडच कार्यान्वित
सरकार सांगतं लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमध्ये 800 बेड,प्रत्यक्षात 325 बेडच कार्यान्वित

राज्यातील ग्रामीण भागातील सगळ्यात मोठे सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल हे बीडच्....

Read more