ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘त्या’ बालविवाह करणार्‍या वकिलाला न्यायालयाकडून तूर्तस दिलासा

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 12:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘त्या’ बालविवाह करणार्‍या वकिलाला न्यायालयाकडून तूर्तस दिलासा

शहर : मुंबई

या वकिलाला या मुलीशी बालविवाह केल्याप्रकरणी अटक झाली होती. तसेच तो दहा महिने कारागृहातही होता. या वकिलाने या मुलीशी लग्न केले त्या वेळी त्याची स्वत:ची मुलगी 15 वर्षांची होती. मात्र आता ही मुलगी 18 वर्षांची आहे आणि तिला आपल्याशी लग्न करायचे आहे, असा दावा करत या वकिलाने गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
गुरुवारी या प्रकरणी न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी मुलगी स्वत:ही हजर होती. तिनेही या वकिलाशी लग्न करायची तयारी दाखवली. मात्र सरकारतर्फे त्याला विरोध करण्यात आला.
मात्र त्याचवेळी या मुलीच्या नावे 11 एकर जमीन, साडेसात लाख रुपयांची मुदत ठेव (एफडी) ठेवण्याचे आणि तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आदेश न्यायालयाने या वकिलाला दिले आहेत. या सगळ्या आदेशांची पूतर्ता करेपर्यंत त्याच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्याला अंतरिम स्थगिती दिली आहे.
या वकिलाने बालविवाह केलेला आहे. त्याच्यावर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल असून विचार करता त्याच्यावर खटला चालायला हवा, असेही सरकारने न्यायालयाला सांगितले.
नंतर हे प्रकरण न्यायमूर्तीच्या दालनात झाले. त्यावेळी न्यायालयाने या वकिलाविरोधातील गुन्हा तूर्त रद्द करण्यास नकार दिला. तसेच त्याच्याविरोधात ‘पॉक्सो’ आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याखालील गुन्हा रद्द करण्याबाबतचा विचार पुढील वर्षी करू, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

मागे

गोरेगावमध्ये धावत्या बसला आग
गोरेगावमध्ये धावत्या बसला आग

                                                        &nbs....

अधिक वाचा

पुढे  

वेल्हे तालुक्यात उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या 200 जणांवर मधमाशांचा हल्ला
वेल्हे तालुक्यात उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या 200 जणांवर मधमाशांचा हल्ला

वेल्हे तालुक्यात उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या दोनशे जणांना मधमाशांनी हल्ला....

Read more