ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Arnab Goswami | अर्णव गोस्वामींचा जेलमधील मुक्काम वाढला, हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा नाहीच

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 07, 2020 06:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Arnab Goswami | अर्णव गोस्वामींचा जेलमधील मुक्काम वाढला, हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा नाहीच

शहर : मुंबई

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना मोठा झटका मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन याचिकेवर अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. जवळपास 6 तासांची दीर्घ सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. असं असलं तरी याचिकाकर्ते सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज करु शकतात, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.

अर्णव गोस्वामी यांना आज जामीन मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. हायकोर्टात आज सकाळपासून युक्तीवाद सुरु होता. मात्र, हायकोर्टाने त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच जामिनासाठी अलिबाग सेशन कोर्टातही याचिका करता येईल. अशी याचिका केल्यास त्यावर 4 दिवसांमध्ये निर्णय घ्यावा, असेही निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशानंतर अर्णव यांना आजची रात्रदेखील क्वारंटाईन जेलमध्ये काढावी लागणार आहे. याबाबत आता पुढील सुनावणी सोमवारी (9 नोव्हेंबर) होणार आहे.

दरम्यान, इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना 4 नोव्हेंबर अटक करण्यात आली. यानंतर अलिबाग न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आरोपींना जेलमध्ये नेता 14 दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. या नियमानुसार, अर्णव गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींना अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत ठेवलं गेलं आहे. अलिबागमधील ही शाळा आरोपींसाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून करण्यात आली आहे. या शाळेतच त्यांना ठेवलं गेलं आहे.

                                            

अलिबाग पोलिसांच्या याचिकेवर 9 तारखेला सुनावणी

अर्णव गोस्वामी यांना पोलीस कोठडी मिळावी यासाठी अलिबाग पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायलयात याचिका केली आहे. या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता अर्णव यांच्या पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनादेखील अटक करण्यात आली. या तिघांनाही अलिबागच्या मुख्य़ न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या सुनावणीनंतर अलिबाग पोलिसांनी सत्र न्यायलयात त्याच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.

मागे

बीएमसी आयुक्त इक्बाल चहल यांना ठाकरे सरकारकडून प्रमोशन, अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती
बीएमसी आयुक्त इक्बाल चहल यांना ठाकरे सरकारकडून प्रमोशन, अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती

मुंबई महानगरपलिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल (Iqbal singh Chahal)) यांना राज्य सरकारने बढ....

अधिक वाचा

पुढे  

लासलगावात दाखल, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक
लासलगावात दाखल, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

आशिया खंडातील अग्रसर कांद्याची दुसऱ्या क्रमांकावर असलेली बाजारपेठ पिंपळग....

Read more