By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 20, 2019 12:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईतील फिरोज जीजीभॉय टॉवर्सचा मॉर्फ केलेला फोटो मोदींविरोधात प्रचार करण्यासाठी वापरल्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला फटकारले आहे. बीएसईच्या इमारतीचा फोटो चुकीच्या पद्धतीने वापरल्याने त्याच्याविरोधात कारवाई करणार असल्याचंही त्यांनी ट्विटरवर स्पष्ट केलं आहे. कुणाल कामरा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करत आहे. १४ एप्रिल रोजी त्याने चार वेगवेगळे फोटो शेअर करत हे ‘हे फोटो म्हणजे मोदींनी दिलेली आश्वासनं,’ अशी उपरोधिक टिप्पणी केली. त्यातच एक बीएसईच्या इमारतीचाही फोटो आहे. यावर आक्षेप घेत बीएसईने ट्विट केलं आहे. एका राजकीय पक्षाविरोधात बीएसई इमारतीचा मॉर्फ केलेला फोटो कुणाल कामराने वापरला आहे. अशा कृतीसाठी इमारतीचा मॉर्फ केलेला फोटो वापरणे बेकायदेशीर आहे. कुणाल कामराविरोधात योग्य ती कारवाई करण्यासाठी बीएसईकडे अधिकार आहेत.
रविवारी २१ एप्रिल रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात ....
अधिक वाचा