By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 02:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सांगली
सांगली-कोल्हापुरात मुसळधार पावसाने थैमान मांडले असून पूरापासून नागरिकांच्या बचावासाठी लष्कर आणि नौदलाची पथके आटोकाट प्रयत्न करीत आहेत. दरम्यान सांगलीतील पलुस तालुक्यात ब्रह्मनाळहून खटावकडे जाणारी बचाव कार्य करणारी खाजगी बोट पलटी झाली आणि त्यातील 14 जण बुडाले. त्यांपैकी 9 जणांचे मृतदेह सापडले. या बोटीत 30 जण होते. मृतांमध्ये 4 महिला, 2 लहान मुली, 1 लहान मुलगा, व 3 पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान ह्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्याना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5लाखाची मदत जाहीर केली आहे.
कोल्हापुरातही काल अशीच घटना घडली. नागरिकांना सुरक्षित स्थळी नेत असतानाच एक बोट पलटी झाली. सुदैवाने बोटीतील सर्वजण सुखरूप किनार्याला पुन्हा पोहोचले.
भारतीय अंतराळ क्षेत्राचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी वर्षा....
अधिक वाचा