ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

BSNL आणि MTNL कडून 4G टेंडर रद्द

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 02, 2020 07:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

BSNL आणि MTNL कडून 4G टेंडर रद्द

शहर : देश

बीएसएनएल (BSNL) आणि एमटीएनएलने (MTNL) 4G टेंडर रद्द केलं आहे. आता पुन्हा एकदा नव्याने हे टेंडर जारी करण्यात येणार आहे. सरकारकडून या दोन्ही कंपन्यांना चीनच्या कंपन्यांचं सामान न खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता नव्या टेंडरमध्ये मेक इन इंडिया आणि भारतीय टेक्नोलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या तरतुदी असणार आहेत.

 लडाखमध्ये LAC (line of actual control)वर झालेल्या संघर्षानंतर, भारताने चीनी टिकटॉक, हॅलो यासारख्या 59 ऍप्सवर बंदी घातली आहे. देशाच्या सार्वभौमत्व, अखंडतेसाठी आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचं सांगत भारताने चीनच्या apps बंदी घातली आहे.

अमेरिकेतही व्हिडिओ आणि शेअरिंग ऍप्सला देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी, चीनी सरकार टिकटॉकचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करत असल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, भारतात चीनच्या 59 ऍप्सवर बंदी घालण्यात आल्यानंतर चीनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. टिकटॉकची TikTok पॅरेंट कंपनी बाईटडान्सला ByteDance कंपनीला 6 अब्ज डॉलर्सचं नुकसान होऊ शकतं, अशी माहिती द ग्लोबल टाईम्सने दिली आहे.

 

पुढे  

पंतप्रधान मोदी अचानक लेहमध्ये दाखल
पंतप्रधान मोदी अचानक लेहमध्ये दाखल

गलवान खोऱ्यातील भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ....

Read more