By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2020 10:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
विजापूर-बंगळुरु मार्गावर रात्री नऊ वाजण्याचा सुमारास एक धक्कादायक घटना घटली. चालत्या बसला अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. आगीने बसला पूर्णत: वेढल्याने बसमधील प्रवाशांचा आरडाओरडा ऐकू येत होता. तोपर्यंत बसने पूर्णपणे पेट घेतल्याने अनेकजण जखमी झालेत. तर या दुर्घटनेत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला.
Karnataka: Five people, including a baby, charred to death and 27 injured, last night in Hiriyur near Chitradurga district, after their bus caught fire on National Highway 4. The injured have been shifted to hospital. pic.twitter.com/Je1PxEbTv4
— ANI (@ANI) August 12, 2020
विजापूरहून बंगळुरुला जाणाऱ्या बसला अचानक आग लागली. या आगीत बसमधील पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. कर्नाटकमधील केआरहल्ली गावाजवळची रात्रीची घटना. कुक्केरी श्री ट्रॅव्हल्स कंपनीची बस २९ प्रवाशांना घेऊन विजापूरहून बंगळुरुला जात होती. रात्री ९ वाजता ही बस विजापूरहून निघाली असता अचानक पेटली. दरम्यान, या आगीच कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.
लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव विज बिलामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महावितरण ....
अधिक वाचा