ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

११ राज्यांमधल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला ४० जागा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2020 10:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

११ राज्यांमधल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला ४० जागा

शहर : देश

देशातील ११ राज्यांमधल्या विधानसभा पोटनिवडणुकीत (By-Election Results 2020 ) भाजपने (BJP) दणदणीत यश मिळवले आहे. ५८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत (By-Election Results) भाजपने ४० जागांवर विजय मिळवला आहे. मध्य प्रदेशात २८ जागांसाठी पोटनिवडणुक झाली. यात बहुमत मिळवण्यासाठी शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारला आठ जागा जिंकणे गरजेचे होते. अखेर भाजपने मध्य प्रदेशात २८ पैकी १९ जागामिळवून बहुमत संपादीत केले आहे. तर ९ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने भाजपला काही प्रमाणात लढत दिली. तर उत्तरप्रदेशमध्येही सहा जगांवर भाजपने विजय मिळवला आहे.

उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या सात जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत (By-Election Results) भाजपने चांगले यश मिळवले.  सात जागांवर झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने सहा, तर समाजवादी पक्षाने केवळ एक जागा जिंकली आहे. तर गुजरातमधील पोटनिवडणुकीतील सर्व जागा भाजपने जिंकल्या आहेत. आठही जागा भाजपने आपल्या ताब्यात राखल्या आहेत. मणिपूर (पाच जागा), हरियाणा (एक), छत्तीसगड (एक), झारखंड (दोन), कर्नाटक (दोन), नागालँड (दोन), ओडिशा (दोन) आणि तेलंगणा (एक) मधील पोटनिवडणुकीसाठीही मतमोजणी झाली.

तर बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएने बाजी मारली आहे. त्यामुळे नितीश कुमार सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. बिहार विधानसभा निडणुकीत भाजपला ७४, जेडीयूला ४३ तर व्हीआयपी आणि एचएएम प्रत्येकी चार जागांवर विजयी झाला आहे. त्यामुळे एनडीएचा एकूण आकडा १२५ म्हणजे मॅजिक फिगरच्या पुढे गेला आहे. बिहार विधानसभा निडणुकीत प्रचारप्रमाणे मतमोजणीही अतिशय रंगतदार झाली.

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महाआघाडीचे सरकार बनणार असे संकेत होते. मतमोजणीच्या दिवशी सकाळी आरजेडीने तशी काही जागांवर आघाडीही घेतली होती. मात्र दुपारी हे कल हळूहळू भाजपकडे वळले. अखेर पहाटे चार वजता अंतिम निकाल हाती आले. यात  एनडीएला १२५ जागांवर विजय मिळाला, तर महाआघाडी ११० जागांवर विजयी झाली आहे. महाआघाडीत आरजेडीला ७५, काँग्रेसला १९ आणि डाव्यांना १६ जागा मिळाल्या आहेत.  

मागे

दिवाळीत मुंबईतील दोन जैन मंदिरे उघडण्यास न्यायालयाची परवानगी
दिवाळीत मुंबईतील दोन जैन मंदिरे उघडण्यास न्यायालयाची परवानगी

दिवाळीच्या काळात मुंबईतील दोन जैन मंदिरे उघडण्यास उच्च न्यायालयाने परवान....

अधिक वाचा

पुढे  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले बिहारच्या जनतेचे आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले बिहारच्या जनतेचे आभार

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत पंतप्रधान मोदींनी बिहारच्या जनत....

Read more