By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 11, 2020 03:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली - देशभरातून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) विरोध होत असताना केंद्र सरकारकडून या कायद्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये गृह मंत्रालयाकडून देशात १० जानेवारीपासून नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू झाल्याची सूचना देण्यात आली आहे. केंद्र सरकारने काल म्हणजे १० जानेवारी रोजी या कायद्याबाबत अधिसूचना जारी केली.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश, आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या मुस्लिम वगळता इतर धर्माच्या शरणार्थींना देशाचे अधिकृत नागरिकत्व मिळणार आहे. तर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या इस्लामी देशांमध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन धर्माच्या नागरिकांना प्रचंड अन्याय सहन करावा लागला. त्यामुळे ते भारतात आले.
Ministry of Home Affairs: Central Government appoints the 10th day of January, 2020, as the date on which the provisions of the Citizenship Amendment Act shall come into force. pic.twitter.com/QMKYdmHHEk
— ANI (@ANI) January 10, 2020
मात्र, भारतात आल्यानंतर त्यांना भारताचे नागरिकत्व मिळालेले नव्हते. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. अखेर नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे आता त्यांना देशाचे अधिकृत नागरिकत्व मिळणार आहे. देशभरात हा कायदा लागू होत असला तरी ईशान्य भारतातील सहा राज्यांमध्ये हा कायदा लागू होणार नाही. यामध्ये आसाम, मेघालय, त्रिपूरा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड या राज्यांचा समावेश आहे.
पुणे - सारथी संस्थेच्या गैर कारभाराविरोधात खासदार छत्रपती संभ....
अधिक वाचा