ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोना संपल्यावर नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होणार- भाजप

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 20, 2020 10:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोना संपल्यावर नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होणार- भाजप

शहर : देश

देशातील कोरोनाची साथ आटोक्यात येऊन परिस्थिती थोडीशी सुधारल्यानंतर केंद्र सरकारकडून लगेचच नागरिकत्व सुधारणा कायद्याची (CAA) अंमलबजावणी केली जाईल, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले. केवळ कोरोनाच्या साथीमुळे CAA ची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. मात्र, आता सर्वच ठिकाणी परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. त्यामुळे आता सरकारकडून CAA च्या नियमांची आखणी केली जाईल. यानंतर लवकरच CAA कायद्याची अंमलबजावणी होईल आणि तुम्हा सर्वांना त्याचा लाभ मिळेल. आम्ही CAAच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध आहोत, असे जे.पी. नड्डा यांनी स्पष्ट केले. ते सोमवारी पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमात बोलत होते. पुढीलवर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपकडून आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. जे.पी. नड्डा यांनी काल उत्तर बंगालमधील संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सिलिगुडी येथील बैठकीत भाजपच्या खासदार आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी काही स्थानिक सामाजिक आणि धार्मिक समूहांची भेटही घेतली.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या ‘फोडा आणि राज्य करा, या धोरणाचा अवलंब करत आहेत. तसेच ममता यांच्या हट्टामुळे पश्चिम बंगालमधील नागरिक मोदी सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांपासूनही वंचित राहिल्याची आरोप नड्डा यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘सबका साथ, सबका विकास या धोरणाने चालतात. त्यामुळे प्रत्येकाला विकासाची संधी मिळते. याउलट ममता बॅनर्जी या दुहीचे राजकारण करतात. आता विधानसभा निवडणूक आल्यावर ममता बॅनर्जी काहीतरी आमिष दाखवून सगळ्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करतील. परंतु, सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची क्षमता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातच आहे. भाजपकडून पश्चिम बंगालच्या जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, असेही नड्डा यांनी सांगितले.

मागे

चीन-पाकला उत्तर देण्यासाठी जोरदार तयारी, अंबाला एयरबेसला लष्करप्रमुखांची भेट
चीन-पाकला उत्तर देण्यासाठी जोरदार तयारी, अंबाला एयरबेसला लष्करप्रमुखांची भेट

पूर्व लडाखमध्ये चर्चा सुरू असूनही चीन माघार घ्यायला तयार नाही. अशा परिस्थि....

अधिक वाचा

पुढे  

राहुल गांधींनी शब्द पाळला, सर्वस्व गमावलेल्या बहिणींना दिल्या घराच्या चाव्या
राहुल गांधींनी शब्द पाळला, सर्वस्व गमावलेल्या बहिणींना दिल्या घराच्या चाव्या

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील दोन बहिणींना गेल्या वर्षी दिलेला ....

Read more