ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सह्याद्री अभयारण्यात पवनचक्क्यांवर कॅमेरे; शिकाऱ्यांवर आता ड्रोनची करडी नजर

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 01, 2020 06:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सह्याद्री अभयारण्यात पवनचक्क्यांवर कॅमेरे; शिकाऱ्यांवर आता ड्रोनची करडी नजर

शहर : मुंबई

          पवनचक्क्यांचा वापर शिकार करणार्यां५वर करवाई करण्यासाठी होऊ शकतो असं कधीच वाटलं नव्हतं ना? पण आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे प्रशासन आसपास जंगलांवर नजर ठेवत आहे! या वेगळ्या प्रकारच्या जुगाडमुळे या भागात चालत असलेली प्राण्यांची बेकायदेशीर शिकार आटोक्यात येऊन गुन्हेगारांना शासन करता येईल. या डोंगराळ भागांमध्ये गस्त घालणे, लक्ष ठेवणे हे वनखात्याच्या कर्मचाऱ्यांसाठी तसे जिकिरीचे काम. 


         यासाठीच सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील अधिकाऱ्यांनी चार PTZ कॅमेरे पवनचक्क्यांच्या खांबावर लावले आहेत. उंचावर लावल्यामुळे या कॅमेऱ्यांच्या नजरेच्या टप्प्यात एक मोठा प्रदेश येतो. हा कॅमेरा कंट्रोल रूम मधून फिरवता येतो. 360 डिग्रीच्या कोनामध्ये फिरवून हा कॅमेरा झूमही करता येतो. या कॅमेऱ्यांच्या नजरेच्या टप्प्यात साधारणपणे एक किलोमीटरचा परिसर येतो. या उपकरणांच्या माध्यमातून रात्रीच्या वेळेला सुद्धा जंगलावर नजर ठेवता येते. व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने रात्रीच्या वेळेला उड्डाण करण्याची क्षमता असलेले दोन ड्रोन सुद्धा वापरात आणले आहेत. हे ड्रोन एका वेळेला साधारणपणे एक तास हवेत गस्त घालू शकतात. 


     सत्यजीत गुजर, मुख्य वनसंरक्षक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, यांनी सांगितले की शिकारी  रोखण्यासाठी रात्रीच्या वेळेला गस्त घालण्यात येत आहे व 55 च्या वर प्रोटेक्शन सुद्धा स्थापन करण्यात आले आहेत. “आम्ही चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये पी टी झेड कॅमेरा व ड्रोनचा वापर सुद्धा करत आहोत. आम्ही चांदोलीच्या वरच्या भागात असलेल्या पवनचक्क्यांच्या खांबांवर हे कॅमेरे लावण्यात आले आहेत. हा प्रदेश डोंगराळ असल्यामुळे तिथे जाणं कर्मचाऱ्यांसाठी जिकिरीचं असतं पण कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला या भागावर लक्ष ठेवता येईल.


        येत्या काळात या कॅमेऱ्यांची संख्या वाढवून प्रस्तावित आहे. तसेच आमचे ड्रोन सुद्धा रात्रीच्या वेळेला उड्डाण करून परिसरावर लक्ष ठेवू शकतात,” असे गुजर म्हणाले. या कॅमेऱ्यावर वनखात्याच्या कंट्रोल रूम मधून लक्ष ठेवण्यात येते. एखाद्या भागात काही हालचाल लक्षात आल्यास कंट्रोल रूम मधील कर्मचारी तिथून हे कॅमेरा झूम करून त्या भागावर लक्ष ठेवू शकतात.


          कोकणातून काही मंडळी शिकार करण्याच्या उद्देशाने कोयना व्याघ्र प्रकल्पामध्ये येतात. त्यामुळे या मार्गावरती बऱ्याच ठिकाणी चेकिंग करण्यात येते व काही दिवसांपूर्वी सशाची शिकार केलेल्या काही जणांना पकडण्यात आले. हा व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे अशा बेकायदेशीर शिकाऱ्यांना सात वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा २५ हजारांचा दंड  होऊ शकतो असे गुजर म्हणाले.
 

मागे

नौशेरा येथील चकमकीत साताऱ्यातील जवान संदीप सावंत शहीद
नौशेरा येथील चकमकीत साताऱ्यातील जवान संदीप सावंत शहीद

         सातारा- मराठा लाईट इंफ्रंट्रीतील जवान नाईक संदीप रघुनाथ सावंत ....

अधिक वाचा

पुढे  

आग वीजवताना इमारतीत स्फोट; जवानांसह नागरिक ढिगाऱ्याखाली दबले
आग वीजवताना इमारतीत स्फोट; जवानांसह नागरिक ढिगाऱ्याखाली दबले

        दिल्ली - राजधानी दिल्लीतील आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. गुरूव....

Read more