By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 13, 2020 12:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसच्या तडाख्यात जगातील अनेक नामांकित व्यक्तीही सापडताना दिसत आहेत. यामध्ये आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पत्नीचा समावेश झाला आहे. कॅनडातील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सोफी जॉर्जिया-ट्रुडो यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर सोफी यांना तात्काळ विलगीकरण कक्षात (आयसोलेशन वॉर्ड) हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून सोफी यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, सोफी या गुरुवारी ब्रिटनमधून एका कार्यक्रमाला हजेरी लावून परतल्या होत्या. तेव्हापासून सोफी यांना ताप येत होता. अखेर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे आता पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही आपल्या घरातूनच कामकाज करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
डॉक्टरांकडून जस्टिन ट्रुडो यांचीही तपासणी करण्यात आली. मात्र, त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र, त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे. कॅनडातील सहा राज्यांमधील १०० लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
करोनाने आतापर्यंत जगभरात ४६०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १,२५,२९३ जणांना करोनाची लागण झाली आहे. भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी आणखी खबरदारीची पावले उचलली आहेत. दिल्ली सरकारने ३१ मार्चपर्यंत सर्व शाळा, कॉलेजेस, चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील पाच संशयित कोरोना रुग्णांपैकी तीन ....
अधिक वाचा