ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मधूनच पूल कोसळल्याने नदीत लटकल्या कार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 07, 2019 12:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मधूनच पूल कोसळल्याने नदीत लटकल्या कार

शहर : देश

गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यात एक पूल मध्येच तुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूल मधो-मध तुटला असून पूलावरुन जात असलेल्या गाड्या नदीमध्ये वाहून जाण्यापासून अगदी थोडक्यात बचावल्या आहेत. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यांवरुन जाणाऱ्या लोकांच्या मदतीने दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना वाचवण्यात आलं.

रविवारी मलंका गावाजवळ जुनागढ - मुंद्राला जोडणारा एक पूल मधूनच तुटला. मधूनच पूल कोसळल्याने पूलावरुन जाणारी वाहनं नदीत लटकलेल्या अवस्थेत राहिली. पूल मध्येच तुटल्याचं पाहताच काही लोकांनी पुढे येत दुर्घटनेत अडकलेल्यांना बाहेर काढत, त्यांना नदीत बुडण्यापासून वाचवलं.

दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

या भागात सतत होणारा पाऊस हे या दुर्घटनेचं कारण मानलं जात आहे. पावसाच्या पाण्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला मातीची धूप होत जाऊन, जमिन सरकून पूल मध्येच कोसळला असल्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मागे

सर्वोच्च न्यायालयाकडून आरेतील वृक्षतोडीला स्थगिती
सर्वोच्च न्यायालयाकडून आरेतील वृक्षतोडीला स्थगिती

मेट्रोच्या नियोजित कारशेडसाठी आरे परिसरात सुरु असलेली वृक्षतोड थांबवण्या....

अधिक वाचा

पुढे  

राफेल आणण्यासाठी राजनाथ सिंह पॅरिसला जाणार
राफेल आणण्यासाठी राजनाथ सिंह पॅरिसला जाणार

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज लढाऊ विमान राफेल आणण्यासाठी ३ दिवसी....

Read more