By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 06, 2019 12:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
देशातील प्रमुख सुमारे 15 बँकाची 7 हजार कोटी रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने विविध राज्यात 169 ठिकाणी छापे मारले आहेत. सीबीआयने आंध्रप्रदेश, चंदीगड, दिल्ली, गुजरात, हरयाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दादरा – नगर हवेली या ठिकाणी कारवाई केली. मात्र सीबीआयने कोणावर कारवाई केली ते उघड केले नाही.
पंजाब नॅशनल बँकेची 13 हजार कोटींची फसवणूक आणि नीरव मोदी, मेहुल चौकसीच्या पलायनानंतर केंद्र सरकारने बँकांची फसवणूक करणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश सीबीयायला दिलेत. बँक अधिकार्यांशी संगनमत करून स्वतःच्या कंपन्यांच्या नावावर कर्ज घेत त्याची परतफेड न करणार्या थक्कबाकी दारांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
फसवणूक झालेल्या बँकामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पीएनबी आंध्रा बँक, ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स, इंडियन ओव्हरसीज बँक, अलाहाबाद बँक, कॅनरा बँक, पंजाब अँड सिंध बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे.
पालघर जिल्ह्याला आठ तारखेपर्यंत 'महा' नावाच्या चक्रीवादळासह अतिवृष्टीच....
अधिक वाचा