ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 31, 2021 09:18 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा

शहर : देश

सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक नियम केंद्राने आणला आहे. विद्यार्थी खरोखर गुणवान असेल तर आता त्याचं एक वर्ष वाया जाणार नाही. दहावीच्या CBSE बोर्डाच्या परीक्षेत त्या अर्थाने कुणीच एखाद्या विषयाच नापास होणार नाही. सीबीएसईच्या नव्या नियमानुसार, दहावीचा विद्यार्थी गणित (mathematics) किंवा विज्ञानात (science) नापास झाला आणि त्यानं ऐच्छिक विषय म्हणून घेतलेल्या कौशल्याधारित विषयात (skill subject) उत्तीर्ण झाला तर त्याला पास असल्याचंच समजलं जाईल.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (artificial intelligence), इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स इत्यादी हे ऐच्छिक विषय आहेत. यानंतर दहावीची टक्केवारी 'बेस्ट ऑफ फाईव्ह सब्जेक्ट्स'च्या आधारावर ठरवली जाईल.

या निर्णयाचं विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनीही जोरदार स्वागत केलं आहे. भारत सरकारचं (Government of India) 'स्किल इंडिया इनिशिएटिव्ह'सुद्धा समोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

CBSE च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक २ फेब्रुवारीला घोषित केले जाईल. जाहीर झाल्यावर दहावी आणि बारावीच्या परीक्षांची डेटा शी https://www.cbse.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे.

मागे

Delhi Bomb Blast | दिल्ली स्फोटाचे धागेदोरे उलगडणार गुलाबी दुपट्टा?
Delhi Bomb Blast | दिल्ली स्फोटाचे धागेदोरे उलगडणार गुलाबी दुपट्टा?

दिल्लीत इस्त्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटाचे धागे दोरे शोधण्यात राष्....

अधिक वाचा

पुढे  

Mumbai Local | लॉकडाऊनपूर्वी काढलेल्या लोकल पासला शिल्लक दिवसांची मुदतवाढ, रेल्वे प्रशासनाचा निर्णय
Mumbai Local | लॉकडाऊनपूर्वी काढलेल्या लोकल पासला शिल्लक दिवसांची मुदतवाढ, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

सोमवारपासून म्हणजेच, उद्यापासून मुंबई लोकल (Mumbai Local) ची दारं सर्वसामान्य प्रव....

Read more