ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

CBSE 10th-12th Datesheet: वेळापत्रकासह बोर्डाकडून नवे नियम जारी, विद्यार्थ्यांनी नक्की वाचा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 03, 2021 10:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30

CBSE 10th-12th Datesheet: वेळापत्रकासह बोर्डाकडून नवे नियम जारी, विद्यार्थ्यांनी नक्की वाचा

शहर : देश

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Education Minister Ramesh Pokhariyal Nishank) यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE 10th-12th Date Sheet) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेमुळे सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालं आहे. अखेर विद्यार्थ्यांना विषयनिहाय परीक्षेची तारीख समजणार आहे. 4 मे ते 10 जून या काळात ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक cbse.nic.in आणि cbse.gov.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झालं आहे (CBSE 10th-12th Date Sheet).

त्यासोबत, या परिक्षेसंबंधी नियमही जारी करण्यात आले आहेत. जर तुम्ही ही परिक्षा देणार असाल तर तुम्हाला हे नियम माहिती असणं गरजेचं आहे.

>> 10 वी आणि 12 वीच्या मुख्य परीक्षांमध्ये निश्चित वेळेचं अंतर असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा तणाव दूर होईल आणि त्यांना तयारीसाठी वेळ मिळेल.

>> 12 वीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये होईल, वेळ वाचवण्यासाठी असं केलं जात आहे. दुसऱ्या शिफ्टमधील परीक्षा ही परदेशात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल.

>> दुसऱ्या शिफ्टमध्ये चार दिवस परीक्षा होईल. या दिवसांमध्ये 10 ची मॉर्निंग शिफ्टमध्ये मुख्य विषयांची परीक्षा असेल. यापैकी जास्त करुन परीक्षा या परीक्षा सेंटरवर होईल. दुपारची परीक्षा निवडक सेंटरवर होईल.

>> जे शिक्षक सकाळच्या शिफ्टला काम करतात त्या शिक्षकांना दुपारच्या शिफ्टला काम करावं लागणार नाही.

>> सीबीएससी बोर्ड परीक्षेचे कंट्रोलर डॉ. संयम भारद्वाजकडून जारी केलेल्या या नियमांनुसार, यावर्षी कमीत कमी दिवसांमध्ये या परीक्षा आयोजित केल्या जातील. गेल्या वर्षी 2020 मध्ये परीक्षा शेड्युल 45 दिवसांचा होत. यंदा हा 39 दिवसांचा असेल.

>> 10 वीच्या वर्गाची 75 विषयांची परीक्षा आणि 12 वीच्या 111 विषयांची परीक्षा होईल.

सीबीएसईचं वेळापत्रक कसं पाहाल?

1. सर्वात आधी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट www.cbse.nic.in आणि www.cbse.gov.in ला भेट द्या.

2. ‘Latest@CBSE’ लिंकवर क्लिक करुन आपला वर्ग निवडा.

3. यानंतर तुमच्या वर्गाप्रमाणे इयत्ता दहावी किंवा बारावीचं वेळापत्रक दिसेल.

4. या ठिकाणी तुम्ही वेळापत्रक डाऊनलोड करु शकता किंवा सेव्ह करुन प्रिंट करु शकता.

CBSE 10th-12th Date Sheet

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यात सीबीएसईच्या परीक्षांचाही समावेश होता. अखेर कमी होत असलेल्या निर्बंधांनंतर शालेय परीक्षा घेण्यास सुरुवात झालीय. परीक्षेच्या वेळी कोरोना संबंधित सर्व नियमांचं पालन केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. सर्व शाळांमध्ये 1 मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. या परीक्षांचा निकाल जुलै 2021 पर्यंत घोषित होईल, असा अंदाज आहे.

 

मागे

जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीची जागा घेणार, कोण आहेत अॅमेझॉनचे नवे सीईओ अँडी जेसी?
जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीची जागा घेणार, कोण आहेत अॅमेझॉनचे नवे सीईओ अँडी जेसी?

अ‍ॅमेझॉनचे फाऊंडर जेफ बेजोस (Jeff Bezos) हे लवकरच कंपनीचं सीईओ पद सोडणार आहेत. त्य....

अधिक वाचा

पुढे  

न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हा सुद्धा तिरंग्याचा अपमान, सामनातून मोदींवर टीका
न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हा सुद्धा तिरंग्याचा अपमान, सामनातून मोदींवर टीका

प्रजासत्ताकदिनी म्हणजे 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाचा जो ....

Read more