By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 30, 2021 11:14 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
दिल्लीच्या अब्दुल कलाम मार्गावरील इस्रायलच्या दूतावासाजवळ काल (29 जानेवारीला) स्फोट झाल्यानं एकच खळबळ उडालीय. या स्फोटात परिसरातील चार ते पाच गाड्यांचे नुकसान झालंय. विशेष म्हणजे दिल्ली स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेजही आता हाती लागलेत. इस्राएलच्या दूतावासाबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालेत. पोलिसांच्या स्पेशल सेलला सीसीटीव्ही फुटेज सापडले असून, 2 व्यक्तींना टॅक्सी सोडत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होत आहे.
आता सीसीटीव्ही फुटेज आणि ड्रायव्हरच्या साथीनं त्या दोघा संशयितांचं स्केच तयार करण्यात येत आहेत. घटनास्थळी पोलिसांना बंद पाकीटही आढळलंय, तसेच एक चिठ्ठीसुद्धा सापडलीय. त्या चिठ्ठीत इस्रायली भाषेतून इशारा देण्यात आला आहे, ये तो ट्रेलर है, असा चिठ्ठीत उल्लेख होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमकडून तपास सुरू आहे.
इस्रायल दूतावासाजवळ स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप अस्पष्ट
प्राथमिक माहितीनुसार, हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अब्दुल कलाम मार्ग हा व्हीव्हीआयपी परिसर आहे. याठिकाणी अनेक देशांचे दूतावास आहेत. इस्रायली दूतावासाबाहेर हा स्फोट झाल्याचे सांगितले जाते. सध्या पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा अब्दुल कलाम मार्गावर दाखल झाल्या असून, तपासाला सुरुवात झाली आहे. या परिसराला सध्या पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झालेय.
या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकायला आला. या स्फोटामुळे उभ्या असलेल्या काही गाड्यांच्या काचा फुटल्या. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. हा परिसर VVIP असल्यामुळे इथली सुरक्षा व्यवस्था कडक असते. या स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. कमी तीव्रतेचा हा स्फोट आहे. 29 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोटात कुणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
आयईडी स्फोटकांचा वापर?
जिंदल हाऊसच्या बाहेर असलेल्या झुडुपांत आढळलेल्या एका पिशवीत असलेल्या स्फोटकांमुळे हा स्फोट झाल्याचं समजतंय. ‘आयईडी’च्या माध्यमातून हा स्फोट घडवून आणण्यात आल्याचा अंदाज आहे. सध्या बॉम्बशोधक पथक आणि इतर तपासयंत्रणांनी घटनास्थळाचा ताबा घेतला असून तपासाला सुरुवात केली आहे. स्फोट झालेल्या परिसरापासून काहीच किलोमीटर अंतरावर ‘बिटिंग द रिट्रीट’ सोहळा सुरू आहे.
दिल्लीच्या अब्दुल कलाम मार्गावर शुक्रवारी संध्याकाळी स्फोट झाल्याची घटना....
अधिक वाचा