ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बर्ड फ्लूचा धोका वाढला, देशातील 7 राज्यांमध्ये संसर्ग झाल्याचं स्पष्ट, महाराष्ट्रात स्थिती काय?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 10, 2021 09:12 AM 2019-02-12T14:15:30+5:30

बर्ड फ्लूचा धोका वाढला, देशातील 7 राज्यांमध्ये संसर्ग झाल्याचं स्पष्ट, महाराष्ट्रात स्थिती काय?

शहर : देश

देशात बर्ड फ्लूचा (Bird flu) म्हणजेच एवियन इन्फ्लुएंजाचा धोका वाढला आहे. भारतातील एकूण 7 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा (Avian Influenza Flu) संसर्ग झाल्याचं समोर आलंय. यात केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. याशिवाय छत्तीसगड, महाराष्ट्र आणि दिल्लीत देखील पक्षांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. याचा अंतिम अहवाल येणं बाकी आहे. त्यामुळे हे अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाने ही माहिती दिली.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या पंचकूला जिल्ह्यात दोन कुकुटपालन कंपन्यांच्या कोंबड्यांमध्ये आयसीएआर-एनआयएचएसएडीकडून केलेल्या चाचणीत एवियन फ्लूचा (एआई) संसर्ग झाल्याचं समोर आलंय. यानंतर मध्यप्रदेशच्या शिवपुरी, राजगड, शाजापूर, आगर, विदिशा, उत्तर प्रदेशच्या झुलॉजिकल पार्क, कानपूर आणि राजस्थानच्या प्रतापगड आणि दौसा जिल्ह्यातील स्थलांतरीत पक्षांमध्येही एवियन फ्लूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालंय.

एकूण 7 राज्यांमध्ये संसर्ग

केंद्र सरकारने या राज्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. आतापर्यंत केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश अशा एकूण 7 राज्यांमध्ये संसर्ग झालाय. छत्तीसगडमध्ये बालोद जिल्ह्यात 8 जानेवारी 2021 च्या रात्री आणि 9 जानेवारी 2021 च्या सकाळी अनेक कोंबड्या आणि जंगली पक्षांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्य सरकारने आपातकालीन स्थितीत आरआरटी पथकाची नियुक्ती केली आणि याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले.

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, दापोली, परभणी आणि बीड जिल्ह्यात पक्षांचे संशयास्पद मृत्यू

याशिवाय दिल्लीतील संजय तलावाजवळ बदकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यांचे देखील नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, दापोली, परभणी आणि बीड जिल्ह्यात मृत्यू झालेल्या पक्षांचे नमुने एनआयएचएसएडीला पाठवण्यात आलेत. दरम्यान, केरळमध्ये दोन प्रभावित जिल्ह्यांमध्ये संसर्गित पक्षांना मारण्याचं अभियान पूर्ण झालं आहे. केरल राज्य सरकारने राज्यात पोस्ट ऑपरेशनल सर्विलांस प्रोग्रामच्या सूचना जारी केल्या आहेत. केरळमध्ये या संसर्गाची तपासणी करायला केंद्राचं पथकही दाखल झालंय.

मागे

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा 46वा दिवस, पुन्हा एका शेतकऱ्याची आत्महत्या
दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा 46वा दिवस, पुन्हा एका शेतकऱ्याची आत्महत्या

केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हर....

अधिक वाचा

पुढे  

जगभरात कोरोनाचा कहर, 24 तासांत 6.79 लाख नवे रुग्ण; 11 हजार लोकांचा मृत्यू
जगभरात कोरोनाचा कहर, 24 तासांत 6.79 लाख नवे रुग्ण; 11 हजार लोकांचा मृत्यू

जगभरात वेगाने आपले पाय पसरणाऱ्या कोरोनाने आता 9 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आ....

Read more