ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यांना मिळणार जीएसटीचे २० हजार कोटी रुपये

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 06, 2020 11:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यांना मिळणार जीएसटीचे २० हजार कोटी रुपये

शहर : देश

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ४२ वी जीएसटी परिषद बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर अर्थमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. ज्याअंतर्गत केंद्रातर्फे राज्यांना २० हजार कोटी रुपयांची जीएसटीची रक्कम सोमवारी रात्रीपर्यंत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

अर्थमंत्र्यांनी केलेली ही घोषणा म्हणजे लॉकडाउनमुळे तिजोरीत खडखडाट असलेल्या राज्यांसाठी हा एक दिलासाच म्हणावा लागेल. दरम्यान, या बैठकीमध्ये केंद्रानं मांडलेल्या प्रस्तावांना जवळपास २० राज्यांनी सहमती दर्शवल्याची माहती अर्थमंत्र्यांनी दिली.

केंद्रानं राज्यांप्रती देय असणारी रक्कम कधीही नाकारली नसल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली. सोबतच कोविडच्या परिस्थितीमुळं उदभवलेली अडचणीची परिस्थितीही सर्वांपुढं ठेवली. “ज्यावेळी जीएसटी कायदा आकारास आला होता, तेव्हा कोविड १९ सारख्या साथीच्या आजाराचा विचार करण्यात आला नव्हता. राज्यांना आम्ही नुकसान भरपाई नाकारलेली नाही, असं त्या म्हणाल्या. कर्ज काढावं लागेल. कसं आणि कधी कर्ज काढायचं ते राज्यांना ठरवाव लागेल हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला.

 

मागे

अखेर 'या' दिवसापासून पुन्हा एकदा 'स्कूल चले हम'
अखेर 'या' दिवसापासून पुन्हा एकदा 'स्कूल चले हम'

कोरोना व्हायरसचा coronavirus प्रादुर्भाव अतिशय झपाट्यानं वाढत असतानाच संपूर्ण दे....

अधिक वाचा

पुढे  

लॉकडाऊनमध्ये चॅटिंगमुळे संसाराची सेटिंग बिघडली, नागपुरात पती-पत्नी वादाच्या तक्रारीत वाढ
लॉकडाऊनमध्ये चॅटिंगमुळे संसाराची सेटिंग बिघडली, नागपुरात पती-पत्नी वादाच्या तक्रारीत वाढ

लॉकडाऊनच्या काळात वाढलेल्या चॅटिंगमुळे अनेक जोडप्यांच्या संसाराची सेटिं....

Read more