ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योतीच अनावरण

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 11, 2019 07:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योतीच अनावरण

शहर : मुंबई

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ज्योत भारतीयांच्या नेहमी मनात तेवत राहावी यासाठी मुंबईत चैत्यभूमी परिसरात अखंड ज्योत लावण्यात आली आहे. या भीमज्योतीच अनावरण आज खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते झाले.

डॉ. बाबाबसाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्यावतीने मुख्यमंत्र्याकडे याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्र्यानी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याबरीबर बैठका घेऊन हे काम महापालिकेच्या निधीतून करण्याचे ठरविले. महापालिका वास्तुविशारदांकडून भीमज्योतीचा आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार निविदा मागविण्यात आल्या. या भीमज्योतीसाठी महापालिकेला 21 लाख 56 हजार रुपये खर्च आला आहे.

चैत्यभूमीवरील ही भीमज्योत सव्वा आठ फुट उंच आणि साडे सात फुट रुंद आहे. तेवणार्‍या ज्योतीचा भाग बिडाच्या धातुपासून बनविला आहे. आठ मिमी जाड काचेच्या आवरणा आड ही ज्योत तेवत राहील. या ज्योतीला महानगर गॅसतर्फे 24 तास अखंड गॅस पुरवठा केला जाणार आहे.

राज्य सरकारतर्फे अखंड प्रज्वलित राहणारी देशातील पहिली ज्योत मुंबईतील ओवल मैदान परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर 3 महिन्यांपूर्वी बसविण्यात आली आहे. त्यानंतर आज अनावरण झालेली भीम ज्योत ही दुसरी ज्योत आहे.

 

 

मागे

ग्रंथालयामुळे वाचन संस्कृती टिकविण्यास मदत - विनोद तावडे
ग्रंथालयामुळे वाचन संस्कृती टिकविण्यास मदत - विनोद तावडे

समाज माध्यमांचा वाढता वापर, बदललेली जीवनशैली  यामध्ये सुध्दा ग्रंथालया....

अधिक वाचा

पुढे  

बाप्पांच्या निरोपाला प्रशासन सज्ज
बाप्पांच्या निरोपाला प्रशासन सज्ज

आज अनंत चतुर्दशी म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप द्यायचा दिवस.....

Read more