By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2019 04:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : madgaon
शतकानुशतके ऐकिव कथांच्या आधारे काही गोष्टी आजही गृहीत धरल्या जात आहेत. त्याचेच उदाहरण मडगावातील चंदोर गावातही पाहावयास मिळत आहे. प्राचीन काळातील एका राणीने दिलेल्या शापावर विश्वास ठेवून आजही त्या धास्तीने तेथील तरुण चंदोर गावात लग्न करीत नाहीत. तर गावाबाहेर जावून लग्न करून आई वडिलांपासून दूर संसार थाटत आहेत. कारण त्या राणीच्या शापामुळे गावात लग्न करून आलेल्या विवाहितेच्या पतीचा मृत्यू होतो, असा समाज आजही आहे. इतकेच काय पण या शापाचा प्रभाव इतका आहे की, या गावात मुलगी देण्यास अन्य गावातील मुलीचे आई वडील सहजासहजी तयार होत नाहीत.
ऑल्विन्हो गोम्स यांच्या 'विलेज गोवा' या पुस्तकातही कदंब साम्राज्यातील राणीने दिलेल्या शापाचा उल्लेख आहे. ज्याचा पिढ्यांपिढ्या मौखिक प्रसार होत असून त्याची लोकांमध्ये आजही भीती कायम आहे. त्यामुळेच अनेक विवाहित तरुण आपले गाव सोडून मडगाव पणजी येथे स्थायिक झाले आहेत.
'इतिहास काय सांगतो'
16 ऑक्टोबर 1345 ला मध्यरात्री नवाब जमाल-उद-दिन याने गोवापुरी (सध्याचे गोवा वेल्हा ) व चंद्रपुर (सध्याचे चंदोर) या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी हल्ला केला. त्यात नवविवाहित राजा सिरियादेवासह कदंबाच्या घराण्यातील सर्व पुरुषांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी या युवा राजाची पत्नी तिच्या वडिलांच्या हंगल येथील महालात होती. काही दिवसांनी ती सासरी आल्यावर तिला आपल्या पतीच्या मृत्यूबद्दल समजले. तसेच राजघराण्यातील सर्व स्त्रीयांनी नदीत उड्या देवून जीव दिल्याचेही कळले. हे ऐकून दु:खी झालेल्या राणीने राजाच्या समाधीवर जावून आपल्या हातातील बांगड्या दगडावर आपटून फोडल्या आणि चंद्रपूरच्या महिलाना शाप दिला. शाप देताना तिने गावात लग्न करून येणार्या नवविवाहित विधवा होतील, असे म्हटल्याचे जुने- जाणकार सांगतात. या शापावर विश्वास ठेवून लोकांनी चंदोर गावात लग्न करणे बंद केले.
गणेशोत्सवानिमित आपल्यालाही श्री गणेशाचे दर्शन व्हावे, त्याची पूजा-अर्चा क....
अधिक वाचा