By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 14, 2019 04:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : bangalore
चंद्रयान 2 ने पृथ्वीची कक्षा सोडली असून त्याचा प्रवास चंद्राच्या दिशेने सुरू झाला आहे. ही भारतासाठी आणि सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20 ऑगस्टला चांद्रयान चंद्राच्या कक्षेमध्ये पोहोचेल. चंद्रयान 2 ची पृथ्वीच्या कक्षेतील शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची हालचाल पूर्ण करून चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी यानाला सज्ज करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.
पहाटे 2 वाजून 21 मिनिटांनी ही यशस्वी हालचाल घडवून आणण्यात आली. यावेळी यानासोबत असणाऱ्या द्रवरूप इंधनावर चालणारी इंजिन सुरू करण्यात आले. जवळपास 103 सेकंद हे इंधन सुरू होते त्यामुळे चंद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत धाढण्यासाठी आवश्यक अशा ट्रान्सफर ओर्बीटमध्ये प्रस्थापित करण्यात आले आहे. पृथ्वीवरून भूस्थिर कक्षेत पाठवल्यापासून चंद्रयान 2 ची कक्षा बदलण्याची ही पाचवी वेळ होती.
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी अनेक संस्था पुढे आले आहेत. ....
अधिक वाचा