By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 15, 2019 11:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : nellore
भारताच्या चंद्रयान -2 च्या महत्वाकांक्षी योजनेकडे संपूर्ण जगाचे लक्ष्य लागून आहे. आज पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी हे यान सतीश धवणं स्पेस सेंटर येथून जीएसएलवी मार्क 3 च्या मदतीने अवकाशात झेपावणार होते. तथापि, तांत्रिक अडचणीमुळे हि मोहीम तूर्तास रद्द करण्यात आली आहे. उड्डानांनतर 52 दिवसानी चंद्रयान -2 चंद्रावर पोहोचणार होते. आता या चंद्रयान -2 च्या प्रक्षेपणाची नवीन तारीख आणि वेळ इस्त्रो लवकरच जाहीर करणार आहे.
या मोहिमेसाठी तब्बल 978 कोटी रुपये खर्च आला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यानाचे सर्व भाग स्वदेशी बनावटीचे आहेत. सुमारे 3 लाख 84 हजार किमी. अंतर पार करून हे यान चंद्रावर पोहोचणार आहे. चंद्राच्या दक्षिण धृवावर रोवर प्रज्ञान उतरेल. त्यानंतर चंद्रावरची माहिती प्रज्ञान कंट्रोल सेंटरला पाठवीत . या मोहिमेचे वैशिष्ठ्य म्हणजे चंद्रयान-2 चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार आहे, अशी मोहीम आज पर्यंतची पहिलीच मोहीम आहे.
अहमदाबाद च्या कांकरीया अम्युजमेंट पार्क मध्ये झोपला तुटल्याने झालेल्या द....
अधिक वाचा