ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चंद्रयान 2 : इतिहास घडवायला भारत सज्ज

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 06, 2019 10:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30

चंद्रयान 2 : इतिहास घडवायला भारत सज्ज

शहर : मुंबई

जवळ पास दीड महिन्याच्या तपश्चर्येनंतर शनिवारी रात्री 1.30 ते 2.30 च्या दरम्यान भारत एक नवा इतिहास रचेल. 22 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून झेपावलेले चंद्रयान 2 हे चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करायला आता काही तासांचा अवधी उरलेला आहे.

शनिवारी रात्री चंद्रयान 2 चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यानंतर भारत जगातला चौथा असा देश ठरेल ज्याने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी यान उतरविले आहे. याअगोदर अमेरिका रशिया आणि चीन या तीन देशांनीच चंद्रावर यशस्वी यंत्र किंवा मानव उतरविले आहेत.

यानाचे सॉफ्ट लॅंडींग झाल्यावर 2 तासानंतर विक्रम लंडर प्रग्यान रोवरमधून बाहेर येईल. चंद्रावर यान उतरविताना यानाचा वेग कमी करावा लागणार आहे. 2 मीटर प्रतिसेकंद इतका वेग राहणे गरजेचे आहे.

चंद्रयान 2 चा प्रवास आता पर्यंत पूर्वनियोजित असा होता. त्यामुळे चंद्रयान 2 चे लॅंडींग ठरल्याप्रमाणे होईल अशीच अपेक्षा सगळ्यांची आहे.त्यासाठी शेवटची 15 मिनिटे ही अत्यंत आव्हानात्मक आहेत.  

या वेळेस इस्रोच्या शात्रज्ञासोबत मनोबल उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ही इस्रो मध्ये उपस्थित असणार आहेत.

मागे

पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पूरपरिस्थितीची शक्यता
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पूरपरिस्थितीची शक्यता

पुरपरिस्थिती ओसरल्यावर तब्बल 15 दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा पावसाने क....

अधिक वाचा

पुढे  

ठाणे बेलापूर मध्येही मंदीचे सावट  
ठाणे बेलापूर मध्येही मंदीचे सावट  

सध्या सुरू असलेल्या मंदीचा फटका हळू हळू छोट्या उद्योगांना बसू लागला आहे. आश....

Read more