By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2019 12:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : salem
संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या भारताच्या चंद्रयान 2 ने आज सकाळी 9.30 वाजताच चंद्राच्या कशेत यशस्वीरित्या प्रवेश केल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने दिली आहे.
#ISRO
— ISRO (@isro) August 20, 2019
Lunar Orbit Insertion (LOI) of #Chandrayaan2 maneuver was completed successfully today (August 20, 2019). The duration of maneuver was 1738 seconds beginning from 0902 hrs IST
For more details visit https://t.co/FokCl5pDXg
चंद्रयान 2 ची ही एतीहासिक कामगिरी भारतीय अवकाश संशोधन संस्थेसाठी मैलाचा दगड ठरणारी आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चंद्रयान 2 ला चंद्राच्या जवळ नेण्याचे आणखी चार टप्पे असतील , असे इस्रो कडून सांगण्यात आले. विक्रम लंडर 2 सप्टेंबरला चंद्रयान 2 पासून वेगळा होईल. 7 सप्टेंबरला लंडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. जीएसएलव्ही एम के 3 एम 1 प्रक्षेपकाव्दारे 22 जुलैला चंद्रयान 2 चे प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याची पृथ्वीपासून कक्षा वाढविण्यात आली.
यापूर्वी यानाच्या सर्व सिस्टिम व्यवस्थित सुरू असल्याचे 14 ऑगस्टला इस्रोकडून सांगण्यात आले होते. भारताची ही दुसरी चंद्रमोहीम असून चंद्राच्या दक्षिण भागावरील माहिती नसलेल्या गोष्टी शोधून काढण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी यांना ३५४ कोटी रुपया....
अधिक वाचा