By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 27, 2019 04:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : bangalore
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पाठविलेल्या चंद्रयान 2 ने चंद्राच्या पृष्टभागाचे टिपलेले दुसरे छायाचित्र पाठविले आहे. 4 हजार 375 किमी उंचीवरून टिपलेल्या या छायाचित्रात चंद्रावरील विविध विवरांचे दर्शन घडते. 23 ऑगस्टला हे छायाचित्र टिपले आहे. पहिले छायाचित्र 21 ऑगस्ट ला टिपलेले आहे.
चंद्रावरील या विवरांमध्येच प्रा.शिशिर कुमार मित्रा यांचे नाव दिलेल्या 'मित्रा' या विवराचाही समावेश आहे, यावेळी अधिक जवळून चंद्रयान 2 ने घेतलेल्या या छायाचित्रात जॅकसन, माच, मित्रा आणि कोरोलोव्ह क्रेटर्स विवर दिसतात. यापूर्वी चंद्रयान 2 ने टिपलेल्या छायाचित्रात मरे ओरिएंटल बेसिल आणि अपोलो क्रेटर्स दिसून आले आहेत.
गुलबर्गा जिल्ह्यातीलआळंद आळंदी येथे दक्षिण सोलपुरातील चिंचपुरच्या चडचणे ....
अधिक वाचा