By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 22, 2019 04:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : nellore
गेल्या हफ्त्यात तांत्रिक अडचणीमुळे 56 मिनिटे अगोदर रद्द केलेलं चंद्रयान-2 चे प्रक्षेपण आज दुपारी 2.43 मिनिटाने यशस्वी प्रक्षेपित झाले. चंद्रावर पोहोचण्यासाठी हे यान 3 लाख 84 हजार कि.मी. अंतर पार करणार आहे. त्यासाठी दीड महिन्याहून अधिक काळ लागणार आहे. चंद्रयान-2 हे एक कठीण मोहीम असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत 3 देशांनी यशस्वी मोहिमा केल्या आहेत.
यशस्वी प्रक्षेपण करण्यापूर्वी इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवण यांनी प्रक्षेपणातील सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्याची माहिती दिली होती. या मोहिमेकडे भारतासह परदेशी माध्यमांचेही लक्ष्य लागले आहेत. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणारी भारताची पहिलीच अवकाश मोहीम आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही भारताची पहिलीच मोहीम आहे. चंद्राच्या लुनार पृष्ठभागावर पोहोचणारा भारत चौथा देश ठरणार आहे. चंद्रयान -2 चे प्रक्षेपण भारताच्या सर्वात शक्तीशाली जीएसएलव्ही मार्क-3 रॉकेट ने करण्यात आले.
मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण लोकल गाड्यांमध्ये नेहमीच प्रचंड गर्दी असते. ....
अधिक वाचा