By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 06, 2019 05:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
कोहलीच्या कार धुण्यासाठी डीएलएफ फेज-१ येथील त्याच्या राहत्या घराबाहेरील पाईपलाइनमधून पिण्याच्या पाण्याचा बेसुमार वापर करण्यात आला. पाण्याचा अपव्यय केल्याने नगरपालिकेने कोहलीच्या घराची देखरेख करणाऱ्या दीपक याच्याकडून दंडाची रक्कम वसुल केली. पालिकेने कोहलीच्या पत्त्यावर नोटीस पाठवली आणि त्याचवेळी दंडाचे ५०० रुपये दीपककडून वसुल केले. विराट सध्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये आहे.
यात एसयूव्ही कारचा देखील समावेश आहे. या गाड्यांना धुण्यासाठी घराशेजारील पाइपलाइनमधून दररोज शेकडो लीटर पाणी वापरलं जातं. याबाबत कोहलीच्या घराची देखरेख करणाऱ्या दीपकला अनेकदा समजावलं देखील होतं. तरीही त्याचा कोणताही उपयोग न झाल्याने तक्रार करण्यात आली. कोहलीला दंड ठोठावणाऱ्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारलं असता पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी कोहलीसह परिसरातील आणखी १० जणांना दंड ठोठावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी वापरण्यात येणाऱ्....
अधिक वाचा