ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई पोलिसांनी हात आखडले, TRP घोटाळ्याचा तपास खास यंत्रणेकडे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 10, 2020 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई पोलिसांनी हात आखडले, TRP घोटाळ्याचा तपास खास यंत्रणेकडे

शहर : मुंबई

गेल्या काही दिवसांपासून चॅनेलच्या टीआरपीचा विषय चर्चिला जात आहे. टेलिव्हिजन चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आल्यानंतर फेक टीआरपीच्या चौकशीची मागणी करण्यात येत आहे. आता टीआरपी घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखे(EOW)कडून करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस दलाची आर्थिक गुन्हे शाखा ही चौकशी करणार असून, डीसीपी पराग मणेर यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची तपासणी होणार आहे. खोटा टीआरपी दाखवून काही चॅनेल्सनी आर्थिक फायदा मिळवल्याचा संशय आहे, यात आर्थिक फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे, असंही पोलिसांनी सांगितलं आहे. (channel TRP scam will be investigated )

टेलिव्हिजन चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला. बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत होते. या माध्यमातून फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला होता, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली होती.

याप्रकरणी फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. तर रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठीही रॅकेट चालवणाऱ्यांकडून मदत घेण्यात आल्याची माहितीही समोर आल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले. त्यामुळे आता रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तकांची चौकशी करण्यात येईल. दुसरीकडे “सत्यमेव जयते! ‘फक्त मराठी आणि ‘बॉक्स टीव्हीच्या चालकांप्रमाणेच लोकांना पैसे देऊन बनावट टीआरपी वाढवण्याऱ्या ‘रिपब्लिक चॅनेलच्या अर्णब गोस्वामी यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी मी मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांच्याकडे करतो.” असे ट्विट प्रताप सरनाईक यांनी केले आहे. त्यामुळे बनावट टीआरपीचा विषय सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरत आहे.

काय आहे प्रकरण?

रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी 400 ते 500 रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे. त्यामुळे आता या टीआरपीच्या आधारे संबंधित चॅनेल्सला मिळालेल्या जाहिरातींचीही चौकशी केली जाईल. तसेच हे जाहिरातदारही या रॅकेटमध्ये सहभागी होते का, याचा तपास केला जाईल अशी माहिती परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

टीआरपी म्हणजे काय?

टीआरपीचा अर्थ टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (Television Rating Point ) असा होतो. यावरुन प्रेक्षक कोणते टेलिव्हिजन चॅनेल जास्त पाहतात, हे ठरवले जाते. टेलिव्हिजन विश्वात कोणती मालिका किंवा वृत्तवाहिन्यांवरील कोणता शो सर्वात जास्त लोकप्रिय आहे, याचे मोजमापही टीआरपीच्या आधारेच केले जाते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जाहिराती मिळवण्यासाठी टीआरपी रेटिंग अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

टीआरपी कसा मोजतात?

टीआरपी मोजण्यासाठी देशातील प्रत्येक शहरात पीपल्स मीटर किंवा बॅरोमीटर लावलेले असतात. याआधारे प्रेक्षकांचे एक ढोबळ सर्वेक्षण केले जाते. यामध्ये काही हजार प्रेक्षकांना समाविष्ट करून घेतले जाते. विशिष्ट ठिकाणी लावलेल्या पीपल्स मीटरवर नोंदवण्यात आलेल्या माहितीवरून लोक टेलिव्हिजनवर सर्वाधिक वेळ कोणते चॅनेल किंवा कार्यक्रम पाहत आहेत, याचा अंदाज घेतला जातो. या पीपल्स मीटरवर प्रत्येक मिनिटाला नोंदवण्यात आलेली माहिती इंडियन टेलिव्हिजन ऑडियन्स मेझरमेंट ( Indian Television Audience Measurements) संस्थेकडे पोहोचवली जाते. यानंतर IATM कडून टीआरपीचा अहवाल प्रसिद्ध केला जातो.

मागे

Jammu and Kashmir : कुलगाम भागात भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा
Jammu and Kashmir : कुलगाम भागात भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरच्या काही भागात सुरक्षाबलाचे जवान आणि दहश....

अधिक वाचा

पुढे  

बलात्काराचा तपास दोन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक; महिला अत्याचार रोखण्यासाठी नवी नियमावली जाहीर
बलात्काराचा तपास दोन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक; महिला अत्याचार रोखण्यासाठी नवी नियमावली जाहीर

हाथरसमधील घटना आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभू....

Read more