By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 12:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या पीएमएलए न्यायालयात ईडीने ७ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि एचडीआयडल समूहाचे सर्वेसर्वा राकेश बसू सारंग बाधवाल पितापुत्रांविरोधात प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रींग ऍक्ट अंतर्गत विविध कलमांखाली आरोप लावण्यात आले आहेत.
या घोटाळयाची कुणकुण लागताच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने राकेश व सारंग यांच्यासह काही कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. मात्र जसजसा तपास पुढे गेला तशी या आर्थिक घोटाळ्यांची व्याप्ती समोर आली. त्यांनतर मग ईडीने आरोपींचा ताबा घेत पुढील तपास सुरु केला. सुमारे ६ हजार ७०० कोटींच्या या घोटाळ्यात पीएमसी बँकेतील सर्वसामान्य खातेदारांची जवळपास ७३ टक्के रक्कम बुडाल्याचे समोर येताच रिझर्व बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध लादत प्रशासनाची नेमणूक केली. या निर्बंधामुळे बँकेचे सुमारे १६ लाख खातेदार हवालदिल झाले. खातेदारांनी मुंबईत जोरदार निदर्शने केली. त्याचे पडसाद लोकसभेतही उमटले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात खातेदारांनी दाद मागत थेट आरबीआय या घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप केला. उसाचं न्यालयाने याचिकाकर्त्याला कोणताही दिलासा देण्यास नकार देत भारतील बँक क्षेत्राशी संभंधित निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे आरबीआयलाच असल्याचे स्पष्ट केले.
मुंबई - मध्य रेल्वेवरील लोकलगर्दीनं आणखी एका 22 वर्षीय तरुणीचा बळी घेतला आ....
अधिक वाचा