By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 10, 2019 05:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मीरा रोड येथील रामदेव पार्क परिसरातील योगेश मिश्राने वडिलांच्या निधनांनंतर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र न दिल्यामुळे तेथील डॉक्टर नीलेश डाहुळे यांना मारहाण करीत दवाखान्याच्या काचाही फोडल्या. मिश्रा व त्याचा मित्र त्यानंतर पळून गेले.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, रामदेव पार्क परिसरात डॉ. डाहुळे यांचा दवाखाना आहे. गेली 8 वर्षे मिश्रा कुटुंबिय कधी कुणी आजारी पडल्यास डॉ. डाहुळे यांच्याकडेच उपचार घेत होते. त्यामुळे डॉ. डाहुळे यांना मिश्रा कुटुंबियाची संपूर्ण माहिती होती. दरम्यान मिश्राचे वडील मरण पावले. ही माहिती डॉक्टराना सांगून त्याने मृत्यू प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. डॉक्टर मृत्यू प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा मिश्राचा समज झाला. तो मित्राला घेऊन तडक डॉक्टरांकडे आला आणि रागाच्या भरात दवाखान्याची तोडफोड करीत त्यांनी डॉक्टराना मारहाण केली.
वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएस आणि पदव्युतर शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रामीण....
अधिक वाचा