By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 01, 2020 10:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
देशाचे पहिले संरक्षण प्रमुख म्हणून बिपिन रावत यांनी पदभार स्वीकारला. देशाच्या लष्करप्रमुख पदावरून मंगळवारी ते निवृत्त झाले. त्यानंतर चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आज त्यांनी सीडीएसचा पदभार स्वीकारला. यानंतर बोलताना बिपिन रावत म्हणाले की, तीनही दलांना एकत्र मिळून आणखी सक्षम करण्याचे ध्येय आहे.आम्ही राजकारणापासून दूर असतो. आम्ही सरकारने दिलेल्या आदेशानुसार काम करतो असंही त्यांनी सांगितलं
Chief of Defence Staff(CDS) General Bipin Rawat: All the three services will work as a team. As per the task given to the Chief of Defence Staff we have to enhance integration and do better resource management. pic.twitter.com/QjuIxuGRHD
— ANI (@ANI) January 1, 2020
देशाचे लष्कर, नौदल, वायुदल एकत्र मिळून काम करावेत. त्यांच्यात योग्य समन्वय साधण्याची जबाबदारी सीडीएसवर असणार आहे. देशाच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच CDSची घोषणेची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली होती.
Chief of Defence Staff(CDS) General Bipin Rawat: All the three services will work as a team. As per the task given to the Chief of Defence Staff we have to enhance integration and do better resource management. pic.twitter.com/QjuIxuGRHD
— ANI (@ANI) January 1, 2020
केंद्रीय मंत्रिमंडळाने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदासाठी सुरक्षा प्रकरणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या समीतीने स्वीकारल्यानंतर सीडीएस पद निर्माण करण्यात आले. यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी केंद्रीय गृह मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अहवाल सादर केला होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याशिवाय तीनही दलांचे प्रमुख उपस्थित होते.
Delhi: Chief of Defence Staff(CDS) General Bipin Rawat with Army Chief Manoj Mukund Naravane, Air Chief Marshal Rakesh Kumar Singh Bhadauria and Navy Chief Karambir Singh and other senior officers pic.twitter.com/kHcEAnzkLB
— ANI (@ANI) January 1, 2020
1999 च्या कारगिल युद्धानंतर तत्कालिन उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रुप ऑफ मिनिस्टर्सनी चीफ ऑफ डिफेन्स पदाची शिफारस केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वातंत्र्यदिनी सीडीएस पद निर्माण करण्याबाबत घोषणा केली होती.
२०२० या नवीन वर्षाचं सगळीकडे उत्साहात स्वागत होत आहे. नवीन वर्ष उजाडतानाच य....
अधिक वाचा