By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 08, 2019 04:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गेल्या 5 पाच वर्षात 3 लाख 20 हजार 488 बाल कामगारांची सुटका करण्यात आली. आणि त्यांचे योग्य पुनर्वसन तसेच त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले. केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्य मंत्री संतोष कुमार गंगवर यांनी ही राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प योजनांतर्गत स्थापन जिल्हा प्रकल्प संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली
बाल मजुरी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने 2016 मध्ये बाल कामगार प्रतिबंधक आणि नियमन दुरूस्ती कायदा आणला. या कायद्यांतर्गत 14 वर्षाखालील बालकांना कुठल्याही प्रकारच्या कामावर ठेवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच कठोर शिक्षे ची तरतूदही कायद्यात करण्यात आली आहे.
बाल कामगारांच्या पुनर्वसनासाठी 1988 पासून राष्ट्रीय बाल मजूर प्रकल्प योजना सरकार राबवित आहे. या योजणेतर्गत 9 ते 14 वयोगटातील मुलांची सुटका करून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षन , मध्यान भोजन, आरोग्य सेवा पुरविल्या जातात . तर 5 ते 8 वयोगटातील मुलांना थेट शिक्षण व्यवस्थेशी जोडले जाते
भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बिरेंदर सिंग धनोआ 9 ते 12 जुलै दरम्यान रश....
अधिक वाचा