By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 14, 2019 11:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर 1889 रोजी प्रयागराज इथे त्यांचा जन्म झाला होता. लहान मुल म्हणजे नेहरूंचा जीव की प्राण होता. मुलं म्हणजे देवा घरची फुलं असं ते कायम म्हणायचे. मुलांवरील त्यांचं अपार प्रेम पाहता हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्तानं भारतात बालदिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. त्यांनी आपल्या विकासकार्यात बाल कल्याण उपक्रमांना मोठं प्राधान्य दिलं. मुलांवर योग्य संस्कार व्हावेत याबाबत ते आग्रही होते. त्यासाठी पालक आणि शिक्षकांनी प्रयत्न करायला हवेत. मुलांचे पहिले गुरू आई-वडिल तर दुसरे शिक्षक असतात त्यामुळे त्यांच्या मनावर उत्तम संस्कार करणं ही त्यांची जबाबदारी असते. असे त्यांचं म्हणणं होतं. मुलांचे अधिकार, शिक्षण आणि मुलांच्या जडणजघडणीबाबत पालकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात नेहरुंचा मोलाचा वाटा आहे. गुगल डुडलकडून बालदिनानिमत्तानं खास डुडल करण्यात आलं आहे. या डुडलमध्ये खेळणी, निसर्ग आणि बालपण यासगळ्या गोष्टी साकारण्यात आल्या आहेत.
बालदिनाची सुरुवात नेमकी झाली कशी?
1856 रोजी इंग्लंडमध्ये जगात पहिल्यांदा चेल्सी इथे बालदिन साजरा करण्यात आला होता. तिथल्या चर्चमध्ये लहान मुलांसाठी एक खास दिवस ठेवला जातो. या दिवशी लहान मुलांसाठी खास गोष्टी, गाणी, खेळ गप्पा ठेवल्या जातात. त्यानंतर हळूहळू सर्व देशांमध्ये वर्षातील एक दिवस बालदिन म्हणून त्यांच्या सोईनुसार साजरा करण्यास सुरुवात झाली.1950 रोजी वुमेंस इंटरनॅशनल फेरडेशननं 1 जून रोजी बालदिन साजरा करण्यावर बंदी आणली. 1 जून हा दिवस सोडून कोणत्याही दिवशी बालदिन साजरा करण्यास हरकत नसल्याचं सांगितलं गेलं. त्याचं कारण होतं 1 जून हा दिवस Children's protection day म्हणून साजरा केला जात होता. त्यानंतर 1954 रोजी संयुक्त राष्ट्राने मुलांचे अधिकार आणि हक्क लक्षात घेऊन 20 नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून घोषित केला. आता सर्व देशांमध्ये 20 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. 1954 ते 1964 रोजी भारतातही 20 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जात होता.
1964 रोजी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर मात्र भारतातील बालदिनाची तारीख बदलण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली म्हणून 14 नोव्हेंबर म्हणजेच त्यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून भारतात साजरा करण्यात येतो. 27 मे 1964 रोजी याबाबत भारतात सर्वानुमते अधिकृत घोषणा करण्यात आली.
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त देशात दरवर्षी १४ नो....
अधिक वाचा