ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'या' बँकेत ४६ हजार कोटींचा घोटाळा उघड

By KISHOR SHINDE | प्रकाशित: ऑगस्ट 30, 2022 11:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'या' बँकेत ४६ हजार कोटींचा घोटाळा उघड

शहर : मुंबई

चीनमध्ये मोठा बँक घोटाळा उघडकीस आला आहे. ग्रामीण बँकांमध्ये उच्च व्याजदराचे खोटे आश्वासन देऊन लोकांच्या आयुष्यभराच्या ठेवी लुटल्याप्रकरणी पोलिसांनी 234 जणांना अटक केली आहे. हे प्रकरण $580 दशलक्ष म्हणजेच 46.3 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित आहे. यावेळी बँकांबाहेर पैसे काढण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. याप्रकरणी आणखी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सोमवारी मध्य चीनमधील अधिकाऱ्यांनी ग्रामीण बँकांमधील (Bank) ठेवींवर जास्त व्याजदर देण्याचे खोटे आश्वासन देऊन लोकांची 46.3 हजार कोटी रुपयांची फसवणूक केली.

हेनान प्रांतातील शुचांग शहरातील पोलिसांनी (Police) या घोटाळ्याशी संबंधित 234 संशयितांना अटक केली. चोरलेले पैसे जप्त करण्यात आल्याचे मध्य चीनच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. लू यिवेईने हा कट रचला आणि तो मास्टरमाईंड असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याने हेनान प्रांतातील चार ग्रामीण बँका बेकायदेशीरपणे चालवल्या आणि त्यांचा पूर्ण ताबा घेतला. आरोपी गुंतवणूकदारांना ठेवींवर वार्षिक 13 ते 18 टक्के व्याज मिळवून देण्याचे आमिष दाखवत असत. गुंतवणूकदारांना विश्वासात घेऊन त्यांनी हा बँक घोटाळा केला.

हेनानमधील या चार ग्रामीण बँकांनी 18 एप्रिलपासून त्यांच्या ऑनलाइन बँकिंग सेवा बंद केल्या होत्या. बँकांनी सिस्टम अपग्रेडचा हवाला देत ग्राहकांना खात्यातून पैसे काढण्यास बंदी घातली होती.

मागे

रेल्वे प्रवासासाठी आता ई-पास सुविधा; असा करा ऑनलाईन अर्ज
रेल्वे प्रवासासाठी आता ई-पास सुविधा; असा करा ऑनलाईन अर्ज

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना आता रेल्वेने ( Local Pass ) प्रवास करता येणार आहे. पण ....

अधिक वाचा

पुढे  

म्हाडाची पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांची बंपर लॉटरी; 'या' योजनेतील सदनिकांच्या किंमती10 टक्
म्हाडाची पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांची बंपर लॉटरी; 'या' योजनेतील सदनिकांच्या किंमती10 टक्

म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, ....

Read more