By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 18, 2019 02:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
'दादरमधील चित्रा चित्रपटगृह बंद करू नका', अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण आहे. या इशाऱ्याची दखल घेत चित्रा चित्रपटगृहाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दादर शिवसेनेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी चित्रपटगृह मालकांना इशारा दिला आहे. याबाबत चित्रपटगृह मालकांना निवेदन सादर केले असून या निवेदनाद्वारे हा इशारा देण्यात आला आहे. चित्रा चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय मालकांनी घेतला आहे.मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या दादर पूर्व येथील चित्रा सिनेमा हे चित्रपटगृह कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास सात दशकांहून अधिक काळ चित्रपट रसिकांच्या मनोरंजनास सज्ज असणारे हे चित्रपटगृहं बंद होत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये निराशा पाहायला मिळत आहे. हे चित्रपटगृह बंद होऊ नये, म्हणून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.चित्रपगृहाचा डबघाईला गेलेला व्यवसाय आणि धालेल्या नुसकानाचं कारण देत चित्रा सिनेमाचे मालक दारा मेहता यांनी चित्रपटगृह बंद होत असल्याची माहिती दिली. त्यांनी आपले वडील, पी.डी. मेहता यांच्याकडून १९८२ मध्ये चित्रपटगृहाची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली होती. 'सिंगल स्क्रीन थिएटरच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. आठवड्याच्या शेवटी प्रेक्षकांची पावलं इथे वळतात. पण, संपूर्ण आठवड्यादरम्यान अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच प्रेक्षक इथे येत असल्याने हे सिनेमागृह चालविणे खर्चीक पडत आहे. त्यामुळे बंदचा निर्णय पुढे आला.चित्रा सिनेमा हे, मुंबईतीच पहिले वातानुकूलित चित्रपटगृह असल्याचे सांगितले जाते. वेळोवेळी त्याच्या नुतनीकरणाचीही कामे करण्यात आली. पण, ऑनलाईन चित्रपटांच्या प्रदर्शनाचं वाढते प्रमाण आणि त्याचा प्रेक्षकांवर असणारा प्रभाव याचा फटका चित्रपटगृह व्यवसायाला बसत असल्याने मोठे संकट उभे राहिले, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
मेट्रो तीन प्रकल्पातील भुयारीकरणाचा तेरावा टप्पा आज पूर्ण झाला. एमएमआरसीअ....
अधिक वाचा