ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अनलॉक ४ : पाहा काय सुरू आणि काय बंद राहणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2020 06:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अनलॉक ४ : पाहा काय सुरू आणि काय बंद राहणार

शहर : देश

कोरोना व्हायरचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. देशात एकूण ३० लाख ४४ हजार ९४१ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर  ५६ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सप्टेंबरपासून देशात अनलॉक सुरू होणार आहे. त्यामुळे या टप्प्यामध्ये अनेक गोष्टी सुरू करण्याची शक्यता आहे.

सरकार चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी देऊ शकते

सप्टेंबरपासून चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी केंद्र सरकार देणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र मॉल्समधील चित्रपटगृह उघडण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नव्या स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरची घोषणा केली.

प्रायोगिक तत्त्वार मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी

दिल्लीमध्ये सप्टेंबरपासून १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वार मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या काळात फक्त ५० प्रवाश्यांना मेट्रोच्या एका बोगीमध्ये प्रवेश करता येणार आहे.

मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आलेली आहे. पण अद्याप अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात  आलेली नाही.

 शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोपावण्यात आला.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील शाळा बंद आहेत. सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी मिळू शकते. मात्र शाळा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने राज्य सरकारकडे सोपावला आहे.

भारतात गेल्या २४ तासांमध्ये देशात ६९ हजार २३९ नव्या रुणांची नोंद झाली असून ९१२ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३० लाख ४४ हजार ९४१ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर  ५६ हजार ७०६ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

 

मागे

Arogya Setu Appचं नवं फिचर; कंपन्या घेऊ शकणार कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची माहिती
Arogya Setu Appचं नवं फिचर; कंपन्या घेऊ शकणार कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची माहिती

आरोग्य सेतू (Arogya Setu) ऍपमध्ये एक नवं फिचर 'ओपन एपीआय सर्व्हिस' (Open API Service) जोडण्या....

अधिक वाचा

पुढे  

भारताला कधी मिळणार कोरोनाची लस? आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिलं उत्तर
भारताला कधी मिळणार कोरोनाची लस? आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिलं उत्तर

देशभरामध्ये कोरोना व्हायरसचं थैमान दिवसेंदिवस वाढत असतानाच कोरोनाची लस क....

Read more