By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 03, 2020 08:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई विमानतळावर तैनात असलेल्या CISF च्या 11 जवानांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. CISF नुसार, 142 जवानांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यापैकी काल 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, तर आज आखणी 7 जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता धाकधूक वाढली आहे.दुसरीकडे, मुंबईत कोरोनाचा वाढता कहर पाहायला मिळत आहे. अनेक दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर, आता डॉक्टर आणि काही पोलिसांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसू लागली आहे. मुंबईत एका पोलीस उपायुक्त अर्थात डीसीपी रँकच्या अधिकाऱ्याला कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
12 पोलीस क्वारंटाईन
या अधिकाऱ्याच्या घशातील नमुने/ स्वॅब चाचणीकरिता पाठवले आहेत. त्याचा रिपोर्ट उद्या येण्याची शक्यता आहे. या रिपोर्टची प्रतीक्षा सर्वांना आहे. दरम्यान, या अधिकाऱ्याच्या कार्यालयातील 12 पोलिसांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे.तर देशात कोरोनााधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात सध्या एकूण 2,301 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 336 नवीन केसेस समोर आले आहेत. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 56 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 157 जण हे बरे होऊन घरी गेले आहेत.
मुंबईत ‘कोरोना’चा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वरळी कोळीवाडा आणि ध....
अधिक वाचा