By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 17, 2020 01:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
रत्नागिरी - यावर्षीच्या हवामान बदलाचा चढ-उतार पाहता पिकांना चांगलाच फटका बसला आहे. हापूस, रायवळ आंबा, आणि काजू या झाडांना डिसेंबर महिन्याच्या अखेरीस मोहोर येवून जानेवारीपर्यंत फळे लागलेली दिसायची. पण यंदाचा अवकाळी पाऊस आणि बदलते वातावरण यामुळे शेतक-यांसह पिकांनाही कळा सोसाव्या लागणार आहेत.
महाराष्ट्रात होणा-या वातावरण बदलामुळे यंदा रत्नागिरीतला हापूस आंबा आणि काजूच्या बागांवर परिणाम वाढत असल्याचे चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे हापूसच्या खवय्यांना यावर्षी दरवर्षीपेक्षा आंबे चाखण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार आहे. यामुळे शेतकरी आणि बागायतदार नाराजी व्यक्त करीत आहेत. त्याशिवाय या सर्व गोष्टींमुळे आंब्याच्या दरांवरदेखील परिणाम होणार आहे.
दरम्यान, आत्ता कुठे हापूस आणि रायवळ आंब्याला मोहोर यायला सुरुवात झालेली आहे. परंतु सकाळच्या धुक्यामुळे मोहोर काळा पडत असून तोसुद्धा गळून पडत आहे. हवामान बदलामुळे काजुच्या बागांवर देखील तेवढाच परिणाम होत असल्याने काजूला चांगला दर मिळण्याची शेतक-यांची आशा मावळताना दिसत आहे. आंब्याचा मोहोर टीकावा म्हणून शेतकरी औषध फवारणी करीत आहेत. त्यामुळे हापूस बाजारात उशिरा जरी दाखल झाला तरी ग्राहकांना मात्र जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत हे नक्की.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्....
अधिक वाचा