By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 15, 2019 03:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आज राज्यात पूरपरिस्थिती आहे. सरकार आणि इतर सर्व यंत्रणांनी पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी नेले. आता आपल्यासमोर ज्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत, त्यांना उभे करण्याचे आव्हान आहे. सरकारला हे काम करावे लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मुख्य प्रधान सचिव, माजी प्रधान सचिव, विविध विभागांचे सचिव, इतर सनदी अधिकारी , आजी माजी आमदार आणि पोलीस दलाचे प्रमुख यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित होते. दरम्यान मानवंदना देण्यासाठी खास गुजरात पोलिसांची तुकडी आली होती. यासोबतच बृहन्मुंबई पोलिसांची तुकडी आणि एसआरपीच्या दोन तुकड्यांनी सलामी दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस पुढे म्हणाले की, आजचा स्वातंत्र्यदिन अनोखा असा आहे. कश्मीरमध्ये शांततेत तिरंगा फडकवला गेला. आज राज्यात पुरस्थिती आहे. केंद्र सरकारकडे 6 हजार 800 कोटींच्या पॅकेजची मागणी केली आहे. त्यातून आम्हाला विकास करायचा आहे परंतु त्यांचे पुनर्वसन वेळेत करू. अनेक जण पूरग्रस्तांच्या आणि आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यांचे आभार.
सरकारने सामान्य माणसाच्या जीवनात बदल होतील, यासाठी सकारात्मक प्रयत्न केला.
आता राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केलेला आहे. वाहून जाणारे पाणी आणायचं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दुष्काळी भाग आम्ही दुष्काळमुक्त करू. पंतप्रधानानी दिलेल्या त्रिसूत्रीवर काम चालू आहे. गरिबांपर्यंत विकास घेऊन जाऊ. देशाच्या आर्थिक विकासात 5 ट्रिलीयन अर्थव्यवस्थेत आमचा सर्वात मोठा वाटा असेल. पाच वर्षे आपली अव्याहत सेवा केली. पुढेही आम्ही ती करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
आज आपण ७३ वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. त्याच प्रमाणे जगात ह्या दिवशी अनेक....
अधिक वाचा