By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 20, 2021 06:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोविडचा लढा संपलेला नाही. त्यामुळे कार्यालयीन वेळच्या बाबतीतही पारंपरिक 10 ते 5 ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. यासाठी वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे असे मोठे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची सहावी बैठक पार पडली. या बैठकीत वाढता कोरोना, लॉकडाऊनसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. (CM Uddhav Thackeray big Statement on office hours new planning)
कल करे सो आज कर, आज करे सो अभी अशी राज्य शासनाची भूमिका आहे. कोविड काळातही राज्य शासनाने विकास थांबविला नाही. सरकारकडून आलेल्या संकटावर मात करीत आम्ही मार्ग काढत होतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
कार्यालयीन वेळांचे नियोजन : धोरण आखावे
कोविडचा लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळच्या बाबतीतही पारंपरिक 10 ते 5 ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे, त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आम्ही आपत्तीला संधीमध्ये बदलवीत आहोत. गेल्या वर्षभरात आपण माहिती तंत्रज्ञानावर भरपूर भर दिला आहे. इंटरनेट सुविधा सर्व गावांमध्ये पोहचणे आमचे उद्दिष्ट्य आहे. भारतनेटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा जाळे पसरविणे सुरु असले तरी अजून दुर्गम भागातील 2500 पेक्षा जास्त गावे आणि खेड्यांमध्ये इंटरनेट व मोबाईल कनेक्टिव्हीटी पोहचलेली नाही. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून ही सुविधा राज्याला लवकरात लवकर कशी मिळेल ते पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गावोगावच्या नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व सेवांचा जलद, चांगला लाभ मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा व्हावी म्हणून राज्य शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी केंद्राने या प्रकल्पांना प्राधान्याने साहाय्य करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. (CM Uddhav Thackeray big Statement on office hours new planning)
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर रा....
अधिक वाचा