ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कुणाला कोणतं खातं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून खातेवाटपाची तारिख जाहीर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 01, 2019 10:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कुणाला कोणतं खातं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून खातेवाटपाची तारिख जाहीर

शहर : मुंबई

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकासआघाडीचं सरकार स्थापन केलं आहे. मात्र, अद्यापही कुणाकडे कोणत्या खात्याची जबाबदारी येणार याविषयीची घोषणा बाकी आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासोबतच कुणाला कोणतं मंत्रालय मिळणार याचीही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ही खाते निश्चिती कधी होणार याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घोषणा केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “सध्या आम्ही सातही लोक एकत्रितपणे काम करत आहोत. त्यामुळे कोणीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. अजूनही खातेवाटप झालं नाही मग काय, असं काहीही नाही. आम्ही सध्या सर्व खाती एकत्रितपणे हाताळत आहोत. त्यामुळे राज्याला पुढे जाण्यात कुठेही अडथळा निर्माण होत नाही. खातेवाटपाचा निर्णय आम्ही पुढील एक ते दोन दिवसात करणार आहोत.

मंत्रिमंडळाने कामकाज करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या परिस्थितीची सर्व माहिती घेतली जात आहे. प्राथमिक बैठक आज (1 डिसेंबर) झाली. आणखी काही बैठका होऊन राज्याच्या स्थितीचं चित्र आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट होईल. त्यानंतर आम्ही ठरवल्याप्रमाणे सर्व निर्णय घेऊ, असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

आरेप्रकरणी आंदोलन करणाऱ्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्याचे आदेश

उद्धव ठाकरे यांनी आरेतील झाडांच्या कत्तलीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, “आरेतील झाडांची कत्तल झाली तेव्हा अनेक पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केलं. त्यानंतर त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. ते सर्व गुन्हे आज मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणासाठी पर्यावरणप्रेमींनी जाकरुक असणं गरजेचं आहे. सरकारला त्यांची देखील उद्याच्या विकासात मदत हवी आहे.

 

मागे

उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश

आरे परिसरातील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद....

अधिक वाचा

पुढे  

आरेप्रमाणे नाणार आंदोलनातील गुन्हेही मागे घ्या- नितेश राणे
आरेप्रमाणे नाणार आंदोलनातील गुन्हेही मागे घ्या- नितेश राणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेड विरोधी आंदोलनात पर्यावरण....

Read more