ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना संधी, एमआयडीसीच्या 'महाजॉब्स पोर्टल'चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 06, 2020 06:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना संधी, एमआयडीसीच्या 'महाजॉब्स पोर्टल'चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

शहर : मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या ‘महाजॉब्स पोर्टल’चे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. उद्योजक आणि अकुशल, अर्ध-कुशल, कुशल मनुष्यबळ यामधील दरी कमी करण्यासाठी हे ऑनलाईन पोर्टल आहे.http://mahajobs.maharashtra.gov.in या पोर्टलवर भेट दिल्यानंतर तरुणांना रोजगाराच्या संधींविषयी माहिती मिळणार आहे.राज्यातील उद्योगात मराठी मुलांना नोकरी मिळावी, हा या पोर्टलचा उद्देश असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. कंपन्यांना कशा प्रकारचे कामगार हवेत याची माहिती कंपनी कामगार विभागाला कळवेल. मग त्यानुसार महाजॉब्स पोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांना नोकरी मिळेल.कंपन्यांनी स्थानिकांना नोकऱ्या द्याव्या, हा ‘महाजॉब्स पोर्टल’ मागचा प्रयत्न आहे. यासाठी डोमेसाईल प्रमाणपत्र बंधनकारक असेल, नोकरीत रुजू होताना हे प्रमाणपत्र देता येईल. तरुणांनी नोंदणी करावी आणि नोकऱ्या मिळवाव्या. एमआयीडसी त्याचा पाठपुरावा करेल. असेही सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नगरसेवकांच्या बाबतीत महाविकास आघाडीचे नेते लक्ष घालत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. विरोधकांना आरोप करण्यापलिकडे कोणतेही काम नाही, असे उत्तर सुभाष देसाई यांनी दिले.

 

मागे

कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील हॉटेल-लॉज सुरु करण्यास परवानगी
कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील हॉटेल-लॉज सुरु करण्यास परवानगी

महाराष्ट्रात हॉटेल आणि लॉज सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. येत्या 8 जुलैप....

अधिक वाचा

पुढे  

राज्यात या शहरातील लोकांनी स्वत:च लागू केला 8 दिवसांचा पूर्ण लॉकडाऊन
राज्यात या शहरातील लोकांनी स्वत:च लागू केला 8 दिवसांचा पूर्ण लॉकडाऊन

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता रायगड जिल्ह्यातील महाड शहरा....

Read more